आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीस वाचवण्यास गेलेल्या तरुणाचाही तलावात मृत्यू, अंबाजोगाई तालुक्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- गावात कमी दाबाने पाणी येत असल्याने आईबरोबर कपडे धुण्यासाठी गेलेली विद्यार्थिनी दगडावरून पाय घसरून तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी तलावात उडी मारलेल्या तरुणाचाही गाळात रुतून मृत्यू झाल्याची घटना  अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील तलावात साेमवारी दुपारी घडली.
 
चनई येथील निकिता घनघाव (१४) ही मुलगी तिच्या आईसह  गावातील खोपरनाथ तळ्यावर  कपडे  धुण्यासाठी गेली होती. कपडे धूत असताना दगडावरून पाय घसरून ती अचानक पाण्यात पडली. याच वेळी देवकुमार सुभाष लोंढे (२२, रा.चनई) यांनी मुलीला वाचवण्यासाठी थेट तलावात उडी  घेतली, परंतु ते तलावाच्या वरच आले नाहीत. गाळात रुतून त्यांचा मृत्यू झाला.
 
हळद फिटण्यापूर्वी मृत्यू  
देवकुमारची आजी चनईची असल्याने तो गावात ऊसतोड मजूर  म्हणून काम करत  होता. तीन महिन्यांपूर्वी भाग्यश्री सोबत त्यांचा  विवाह झाला होता. हळद फिटण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
 
बातम्या आणखी आहेत...