आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Youths Died In Car Truck Accident, 1 Injured

कारची ट्रकला धडक; दोन युवक ठार, एक जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एरंडोलयेथील हॉटेलमध्ये जेवण करून जळगावकडे येणाऱ्या युवकांची भरधाव स्विफ्ट कारने ट्रकला धडक दिली. त्यात दोन युवक ठार, तर एक गंभीर जखमी झाला. तसेच कारचा चुराडा झाला आहे. हा अपघात रविवारी रात्री वाजेच्या सुमारास पाळधीजवळील हॉटेल कर्मासमोर झाला.

जळगावातील वाघुळदेनगरात राहणाऱ्या अमित विजय भावसार (वय ३२) याने वर्षभरापूर्वी एरंडोल येथे हॉटेल दीपाली चालवण्यास घेतली आहे. रविवारी रात्री ८.३० वाजता नितेश शंकरलाल शर्मा, (वय ३०, रा.गंधर्व कॉलनी) हा क्रितेश रामराव पाटील (वय ३०, रा.शिव कॉलनी) याला त्याच्या स्विफ्ट कार (क्र.एमएच-१५-बीएक्स-३०७९)ने एरंडोलला अमितकडे घेऊन गेला होता. रात्री १२ वाजता अमित हॉटेल बंद करत असताना दोघे तेथे पोहोचले. तिघांनी हॉटेलमध्ये जेवण केले. अमित दररोज जळगाव-एरंडोल अप-डाऊन करतो; पण मित्रांच्या आग्रहामुळे तो त्यांच्यासोबत कारने जळगावकडे येण्यास होकार देत निघाला. या वेळी नितेश कार चालवत होता. त्याच्या बाजूला क्रितेश मागच्या सीटवर अमित बसलेला होता. मात्र, भरधाव कारने पाळधीजवळ हॉटेल कर्मासमोर रात्री वाजता धुळ्याकडे स्टील पाइप घेऊन जाणाऱ्या ट्रक (डब्ल्यूबी-२३-सी-९६८२)च्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या अपघातात कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला ट्रकच्या समोरील काच फुटली. अपघातानंतर दोन्ही वाहने डाव्या बाजूच्या खड्ड्यात गेली. अपघातात क्रितेश नितेश या दाेघांच्या डोके, हात पायाला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. जैन इरिगेशनच्या कर्मचाऱ्यांनी या अपघाताबाबत पाळधी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

अमित,क्रितेश नितेश हे तिघे शाळकरी मित्र होते. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले असून, तेव्हापासून तिघांनी मैत्री जोपासलेली आहे. नितेश रविवारी सकाळी ११ ते या वेळेत नेहरू युवक मित्र मंडळाच्या ठिकाणी उपस्थित होता. सत्यनारायणाच्या पूजेलाही त्याची उपस्थिती होती. त्याने मित्रांना सायंकाळी आग्रहपूर्वक आइस्क्रीम खाऊ घातली त्याचे बिलही दिले. त्यानंतर रात्री ही दुर्दैवी घटना घडली. त्याने रात्री वाजता आय.व्ही.एस. महाविद्यालयात गणपतीची आरती केल्याचे त्याचा मित्र अजय गांधी याने सांगितले.