आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनियांकडे पाणी भरताना मराठ्यांचे प्रश्न दिसले नाहीत? उद्धव यांचा पवारांना सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘शरद पवार बाेलतात काही अाणि करतात काही. अाता त्यांनी मराठा अारक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र माेदींशी चर्चा केल्याचे सांगितले जाते. त्यांनी खरंच चर्चा केली की नाही, हे माहीत नाही. मात्र, एवढी वर्षे त्यांनी साेनियाबाईंकडे पाणी भरले तेव्हा त्यांना मराठा अारक्षण, अॅट्राॅसिटी कायद्यातील बदल हे प्रश्न साेडवण्याची गरज वाटली नाही का? गेली दहा वर्षे त्यांचा पंतप्रधान असूनही त्यांनी अारक्षणाचा विषय का मांडला नाही? सत्ता गेल्यावर अाणि माेर्चांची ताकद पाहिल्यानंतरच ‘त्यांना मराठे अाठवले कसे?,’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर सभेत विचारला.
विविध विकासकामांचे उद््घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे गुरुवारी पाचाेरा येथे अाले हाेते. या वेळी अायाेजित जाहीर सभेत त्यांनी शरद पवार, ‘पाॅलिटिकल स्ट्राइक’सह विविध विषयांवर सडेताेड भूमिका मांडली. राज्यमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अामदार चंद्रकांत साेनवणे, किशाेर पाटील, माजी अामदार अार.अाे. पाटील, माजी मंत्री सुरेश जैन अादी उपस्थित हाेते. किशाेर पाटील- गुलाबराव पाटील या काका-पुतण्यांचे काैतुक करताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार अाणि अजित पवार या काका-पुतण्यांवर मात्र सडकूून टीका केली. ‘काही काका-पुतणे कामातून बाेलतात, तर काही केवळ वायफळ बडबड करून मनाेरंजन करतात,’ असा टाेलाही त्यांनी लगावला. अातापर्यंत सत्तेत असूनही शरद पवारांनी मराठ्यांचा प्रश्न साेडवला नाही किंवा मांडलादेखील नाही’, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मुखपत्रातील वादग्रस्त व्यंगचित्रप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी करत उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमाेर मराठा संघटनांच्या वतीने पाचाेऱ्यात निदर्शने करण्यात अाली. तसेच मागणीचे निवेदनही ठाकरे यांच्याकडे साेपवण्यात अाले.
पाकिस्तानात सैन्य घुसवण्याची हीच वेळ
सर्जिकल स्ट्राइकवरून राजकारण करणे चुकीचे अाहे. अशा वेळी सर्व देश एकसंघ राहिला पाहिजे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानचे तुकडे करण्यासाठी तेथे अाता फाैजा घुसवल्या पाहिजेत. इंदिरा गांधींनी बांगलादेशासाठी पाकचे तुकडे केले हाेते. तसे करण्याची ही वेळ अाहे, असे सांगून सर्जिकल स्ट्राइक झालेच नसल्याचा दावा करणाऱ्या चिरकुटांना जाेडे मारले पाहिजेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
फोटो - पाचाेरा (जि. जळगाव) येथील सभेच्या व्यासपीठावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेे, माजी मंत्री सुरेश जैन व राज्यमंत्री गुलाबराव पाटील.
बातम्या आणखी आहेत...