जळगाव-
आपणच ठरवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीसमोर शेपूट हलवणारा हवा की, ताठ मानेने वागणारा स्वाभिमानी. अशा शब्दात मतदारांना आवाहन करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप काँग्रेसवर सडकून टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट ठाकरेंनी सोमवारी खान्देशात तीन सभा घेऊन केला. तिनही प्रचारसभांमध्ये त्यांनी भाजप नेते एकनाथ खडसेंवर सडकून टीका करून मुक्ताईनगरात खडसेंना उताणे पाडणार असल्याचा दावा केला.
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या धुळे, मुक्ताईनगर आणि जळगावात सभा झाल्या. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर बोलताना प्रचाराची सांगता विजयाची मुहूर्तमेढ जळगावात करीत असल्याचे ठाकरे म्हणाले. या वेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, आर.आर.पाटील, राजेश जैन यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व उमेदवार उपस्थित होते. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी श्री संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी दुपारी वाजता उध्दव ठाकरे यांची सभा झाली. व्यासपीठावर भुसावळचे सेनेचे उमेदवार संजय ब्राम्हणे, रावेरचे उमेदवार प्रल्हाद महाजन, संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर, इंदिराताई पाटील, इंडियन आयडॉल अभिजित सावंत, अशोक राणे, रमेश सापधरे, प्रमोद देशमुख, गजानन मालपुरे, छोटू भोई, अफसर खान, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
जळगाव येथील शिवसेनेच्या सभेस उपस्थित जनसमूदाय.
काँग्रेस उमेदवार डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या प्रचारार्थ फुले मार्केट, जुने जळगाव, नेरीनाका यासह विविध भागात रॅली काढण्यात आली.
मनसे उमेदवारललित कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिवाजी पुतळा चौक, खान्देश मिल कॉम्प्लेक्स, नेहरू चौक, टॉवर, भिलपुरा चौकी, सराफ बाजार, रथचौक, जुने जळगाव, जोशीपेठेसह अनेक भागात रॅली काढण्यात आली. या वेळी सिंधू कोल्हे, भक्ती कोल्हे, पीयूष कोल्हे, अनंत जोशी, वसंत कोल्हे, लीना पवार, सुनील पाटील, जितू करोसिया आदी उपस्थित होते.
दल्लीचा पोपट कोण ?
काँग्रेसराष्ट्रवादीला विचारा तुमचा मुख्यमंत्री कोण? असे सांगत पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार मुख्यमंत्री होणार की, दिल्लीचा पोपट मुख्यमंत्री होणार? असे वक्तव्य केले. ठाकरेंच्या नजरेतला दिल्लीतला पोपट नेमका कोण? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. गरज होती तोपर्यंत मैत्री ठेवली, आता केंद्रात सत्ता येताच मैत्रीचे हिंदुत्वाशी नाते तोडले. असाच विश्वासघात हरियाणातही केला. ही तिरकी चाल यशाकडे नाही तर खड्ड्यात घेऊन जाईल, असा इशारा दिला.
फडणवीस, खडसेंना केले टार्गेट
विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपवर ठाकरेंनी तोडसुख घेतले. डॉ. विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्यावर खडसेंनीच आरोप केले होते, त्यासाठी विधानसभा बंद पाडल्याची आठवण करून दिली. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. रावणाच्या वधासाठी िबभीषणच पाहिजे, असे फडणवीस म्हणाले होते. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी भाजपनेच रावणाची दहा तोंडे घेतली असल्याची टीका केली. भ्रष्टाचार काढायचा असेल तर अजित पवारांचा काढा, सिंचनातील भ्रष्टाचाराचा पैसा बाहेर पडत आहे असेही ते म्हणाले