आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांची जळगावला जाहीर सभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पारोळा, धरणगावला नको तर ती जळगावलाच घ्या; यावर एकमत झाले. परंतु सभेच्या ठिकाणावरून रुसवे-फुगवे बाजूला सारून एकत्रित येऊन सभा यशस्वी करण्याचा सल्ला प्रत्येक पदाधिकार्‍याने बैठकीत दिला.

उद्धव ठाकरे यांच्या जळगाव जिल्हा दौर्‍यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीच्या ठिकाणावरून एकमेकांना चिमटे काढत शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या. ठाकरे यांची सभा जळगावलाच घ्या, असा आग्रह पदाधिकार्‍यांनी लावून धरल्यामुळे तो निर्णय आमदार चिमणराव पाटील यांनादेखील मान्य करावा लागला.