आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आज मतदारसंघांचा आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 जुलै रोजी नाशिक येथे प्रत्येक मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. यासाठी जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी रवाना होणार आहेत.

कार्यकर्ता मेळाव्यानिमित्ताने जळगाव दौर्‍यावर येऊन गेलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी नाशिकला येत आहेत. या वेळी ते खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा सखोल आढावा घेणार आहेत. यापूर्वी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मेळावे घेण्यात आले. त्यात आलेल्या सूचना व मागणी यासंदर्भात पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात येणार आहेत. यासाठी मतदारसंघांतील आजी माजी आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांना बोलावण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजता नाशिक येथील ताज हॉटेलमध्ये जळगाव जिल्ह्याचा आढावा स्वत: पक्षप्रमुख ठाकरे घेणार असल्याचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.