आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंकडून सुरेश जैन यांना भजे महोत्सवाविषयी विचारणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण तलावावर गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर झालेल्या राजकीय भजे महोत्ससवाची राज्यभर चर्चा सुरू अाहे. बुधवारी जळगाव दाैऱ्यावर अालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी अालेले माजी अामदार सुरेश जैन यांनाच याबाबत विचारणा करीत चिमटा काढला.
 
विमानतळावर सकाळी ११.३० वाजता दाखल झालेल्या उद्धव ठाकरेंचे सुरेश जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उत्तरादाखल ठाकरे यांनी हसत राजकीय भजे पार्टीचा विषय छेडला. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे तुम्हाला भजी भरवत असल्याचा फाेटाे बघितल्याचे ठाकरे म्हणाले. त्या वेळी सुरेश जैन यांनी हसत भजे महोत्सवाबाबत ठाकरे यांना माहिती दिली. विमानतळावरून ठाकरे पाळधीला रवाना झाले.
 
बातम्या आणखी आहेत...