आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीच्या आधारावर घरं पेटवण्याऐवजी घरातली चूल पेटवा -उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जातीच्या आधारावर राजकारण करून घरे पेटवण्याएेेवजी घरातल्या चुली पेटवा. पोटात पेटलेली आग आधी विझवा, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला. तसेच पाक व्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींंची अभिनंदन केले. पण, सर्जिकल स्ट्राईकचे पुरावेे मागणार्‍यांना जोड्याने मारा, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांंचा महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. राज्यातील पहिला दौरा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे होत आहे. पाचोरा नगरपालिकेच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे आमदार सुरेश जैन व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळेे जळगावच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांची घेेतली भेट...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेला सैनिक चंदू चव्हाण यांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांना धीर दिला. चंदूला परत आणण्यासाठी पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

काय म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख...?
- आमदार सुरेश जैन यांना विनाकारण अडकवण्यात आले आहे.
- येथे माणसं विश्वासाच्या नातेने उपस्थित आहेत.
- शिवसेनेचे आमदार आधी काम करतात मग बोलतात.
- केळीला फळाचा दर्जा का दिला जात नाही? असा उद्धव ठाकरे यांचा सवाल
- राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे.
- सत्तेत आल्यानंतरही आश्वासने सरकार का पूर्ण करत नाही? असेही ठाकरे म्हणाले.
- जातीच्या आधारावर राजकारण करणार्‍यांवर कठोर शब्दात ‍ठाकरेंनी प्रहार केला.
- जाती-पातीचे राजकारण करुन घरं पेटवण्यापेक्षा घरातली चूल आधी पेटवा. पोटातली आग आधी विझवायला हवी, हे आधी ओळखा.
-शिवसेनेची मागणी मान्य करुन ईबीसी सवलत 6 लाखावर नेल्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
-राज्यभरात यापुढेही मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगायलाही उद्धव विसरले नाहीत.
- राजर्षी शाहू योजनेअंतर्गत 6 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या तरुणांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची 50 टक्के फी सरकार भरणार आहे.
- दरम्यान, फी प्रतिपूर्ती योजना शिवसेनेमुळेच लागू झाली हे सांगतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पवारांवर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
- सोनियांकडे पाणी भरताना मराठा आरक्षण का घेतलं नाही? अशी टीका उद्धव ठाकरेंनी पवारांवर केली.
- सरकारने आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे, ही आमची आधीपासूनची मागणी आहे.
-शाहू, फुले आणि आंबेडकरांनी घडवलेल्या महाराष्ट्राची जबाबदारी आपली असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...