आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ulhas Patil News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi, Jalgaon

अपक्ष असलो तरी मी कॉँग्रेसचाच!,डॉ. पाटलांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणूक अर्ज दाखल केल्यापासून माझ्या प्रत्येक कृतीची माहिती पक्षाकडे आहे. मी अपक्ष लढत असलो तरी कॉँग्रेस विचाराचाच आहे. पक्षाला सर्व माहीत असल्याने माझ्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मी आणि पक्ष याबाबतीत बिनधास्त असल्याचा दावा डॉ.उल्हास पाटील यांनी केला. जाहीरनामा प्रसिद्धीसाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


खिरोदा येथील स्वतंत्र्य सैनिक दामोदर महाजन आणि पंडित महाजन यांच्या हस्ते डॉ.उल्हास पाटील यांनी स्थानिक विकासाचे मुद्दे असलेला जाहीरनामा प्रसिद्ध केला. कापूस, केळी प्रक्रिया उद्योग, पाण्याचे प्रश्न, रोजगार आणि उद्योगांवर आधारित प्रगती, शैक्षणिक विकास, केंद्रीय प्रकल्पातील समस्या, रेल्वे इंजीन कारखाना, दळणवळण, एनर्जी पार्क, विद्युत प्रकल्प, महिला आणि बालकल्याणाच्या योजना, ठेवीदारांसाठी पॅकेज, अल्पसंख्याकांसाठी योजना, तालुकास्तरावर ग्रंथालय, जिल्हा परिषद गटांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वनजमिनीवर वृक्षारोपण, शेतीमाल निर्यातीसाठी काबरेहब, हॉर्टिकल्चर ट्रेन नियमित सुरू करणे, मेगारिचार्ज, बोदवड सिंचन योजना आदी विषय जाहीरनाम्यात आहे.