आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसुरक्षेसाठी एकात्मिक नियोजन हवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भारतात उपलब्ध असलेल्या जलसंसाधनांचा विचार करता पाण्याच्या काटेकोर नियोजनाच्या दृष्टीने कृषीक्षेत्राच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या जलसंसाधनांचा विचार करून एकात्मिक नियोजनावर भर द्यावा लागणार आ हे. त्यासाठी आ धुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधन मंत्री उभा भारती यांनी केले.
जैन हिल्स येथील उच्च कृषी संशोधन केंद्र, फळप्रक्रिया प्रकल्प, टिश्यूकल्चर बायोलॅब, सोलर प्रकल्प, टिश्यूकल्चर पार्क प्लास्टिक पार्क येथील सर्व संशोधन प्रकल्पास उमा भारती यांनी शुक्रवारी भेट देऊन जल बचतीच्या दृष्टीने विविध संशोधनांची माहिती त्यांनी घेतली. या वेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए.टी.पाटील, जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन उपस्थित होते. भारतातील कृषीक्षेत्राला आवश्यक असलेले पाणी, त्याची उपलब्धता उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर होण्यामध्ये उच्च कृषी तंत्रज्ञानाची उपयोगिता याबाबत अनिल जैन यांनी उमा भारती यांना माहिती दिली. दरम्यान, बरड जमिनीचा उपयोग फलोत्पादनाच्या दृष्टीने अधिक चांगल्या पद्धतीने व्हावा. या दृष्टिकोनातून डोंगराच्या बरड भागावर लावलेल्या पेरूबागेत जाऊन मंत्री उभा भारती माहिती घेतली.