आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर निधीसाठी अायुक्तांच्या दालनाबाहेर उभे राहावे का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -
महापालिकेत अायुक्त मनमानी कारभार करत अाहेत. त्यांना जाब विचारणारे काेणी नाही का? कर्मचाऱ्यांचे पगार करायला अामचा विराेध नव्हता. मात्र, तेराव्या वित्त अायाेगाचा निधी खर्च करण्यापूर्वी विचारणाही केली नाही. अाता किरकाेळ कामांसाठीही अाम्हाला खर्च करावा लागताेय. कामे हाेत नसतील तर निधीसाठी अायुक्तांच्या दालनाबाहेर हात जाेडून उभे राहायचे का? असा संतप्त सवाल खान्देश विकास अाघाडीने केला आहे.

स्थायी समितीची सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता सभापती ज्याेती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सभेच्या सुरुवातीलाच विषय पत्रिकेवरील २५ अंगणवाडी केंद्र बांधण्याचा विषय सभापती चव्हाण यांनी तहकूब ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सर्वच विषय सर्वानुमते मंजूर करण्यात अाले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला २५ काेटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खर्च केला जाणार अाहे. त्यामुळे महापालिका कामे करण्यास सक्षम नाही का? असा प्रश्नही उपस्थित केला. सभापती चव्हाण यांनीदेखील यासंदर्भात निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणार नाही. काेणताही पैसा वाया जाणार नाही. तेराव्या वित्त अायाेगाचा पैसाही पगारासाठीच खर्च झाल्याचे सांगितले. तसेच सभेच खाविअाचे नगरसेवक अमर जैन अायुक्तांच्या मनमानी कारभाराबाबत चांगलेच संतापले हाेते.
सभापतींकडूनच विषय तहकूब
स्थायीसमितीच्या सभापती ज्योती चव्हाण यांच्याकडून विषय सुचवल्यानंतरच नगर सचिव सभेचा अजेंडा निश्चित करीत असतात. त्यामुळे त्यांना विषयपत्रिकेतील विषयांची पूर्ण कल्पना असते. परंतु शुक्रवारच्या सभेत अंगणवाडीचा विषय तहकूब ठेवण्याचा निर्णय खुद्द सभापतींनीच घेतला. अभ्यास करून विषय पुन्हा घेतला जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे सभापती अभ्यास करताच विषय पटलावर आणतात अशी टीका होऊ लागली आहे. एखादा विषय आपणच तहकूब करण्यामागे नेमके कारण काय?असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
डाॅक्टरांची कमतरता
महापालिकेच्यािशवाजीनगरातील डी.बी.जैन रुग्णालयात डाॅक्टर नसल्याने शस्त्रक्रिया प्रसूती हाेत नाही. त्यामुळे रुग्णांना सिव्हिलमध्ये हलवावे लागते. रुग्णांचे हाल हाेत असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक रवी माेरे यांनी सांगितले. पालिकेकडे केवळ दाेन एमबीबीएस डाॅक्टर असल्याने तसेच शाहू रुग्णालयात गर्दी हाेत असल्याने इतरत्र वर्ग करता येत नसल्याचे डाॅ.राम रावलानी यांनी स्पष्ट केले.

वाहनविभाग पुन्हा चर्चेत
अाराेग्य,अतिक्रमण बांधकाम विभागाचे वाहन किरकाेळ कामांसाठी थांबून अाहेत. २७०० रुपये दिले जात नाहीत म्हणून शाैचालय साफ करण्याचे वाहन अडकून पडल्याचे सुनील माळी यांनी सांगितले. डाॅग व्हॅनची समस्याही सुटत नाही. तसेच मार्ग ही निघ‌त नसल्याने सभापती संतापल्या. शिवाजीनगरातील विकास कामे टक्केवारीमुळे थांबल्याचा अाराेप राजू पटेल यांनी केला.

दाेन दिवसांत लाइटची कामे
वीजविभागाकडून पथदिवे ही लावले जात नाहीत. नगरसेवकांना मदतीचे अावाहन केले जाते. नागरिकांची कामे पदरमाेड करून नाही करता येणार, अशी व्यथा मांडली. यावर निविदा काढली असून दाेन दिवसांत वीज विभागांतर्गत येणारी कामे सुरू हाेतील, असे सुशील साळुंखे यांनी सांगितले. सभापतींनी नगरसेवकांना कामांबाबत लेखी देण्याच्या सूचना केल्या.