आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorised Water Connection Now Face Criminal Charges

अनधिकृत नळजोडणी केल्यास यापुढे फौजदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील अनधिकृत नळ संयोजनाची तपासणी करून असे संयोजने बंद करण्यात येत आहेत. काही ठिकाणी असलेल्या कनेक्शनचे मालक आढळून येत नसल्याचेही प्रकार आहे. यापुढे अनधिकृत जोडणी केल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पालिका प्रशासनाने प्रभाग समिती कार्यालय एक अंतर्गत अलाउद्दीन बारुद्दीन याच्याकडे पाणीपट्टीचे २१ हजार २० रुपये, के. जी. ठोमरे १० हजार ५३४ रुपये, शेषराव मांडलीक ११ हजार ९०७, गुणवंताबाई बाविस्कर २७ हजार ६६४ रुपये थकबाकी असल्याने नळसंयोजन बंद करण्यात आले. प्रभाग समिती कार्यालय दोन अंतर्गत रसूल शेख भिकन १९ हजार ३८६, शेख इब्राहिम शेख हुसेन २३ हजार २६०, कमराबी रहेमान २५ हजार ८२०, हसनूरबी मोहम्मद २५ हजार ३८८, नजीर खान ३३ हजार ५१०, चांदसरदा पिंजारी ६५ हजार ९१२ रुपये थकवल्याने अशांचे नळ संयाेजन बंद केले आहे. यासह मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढवण्यात आला आहे. यापुढे अनधिकृत नळजोडणी केल्याचे निदर्शनास आल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

पालिकेच्या मक्तेदारांची आढावा बैठक
पालिकाहद्दीत रस्ते, गटारी इतर कामे करणा-या मक्तेदारांची उपमहापौरांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. या वेळी विरोधी पक्षनेते वामनराव खडके, स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण, गटनेते नितीन बरडे यांसह सर्व युनिट अभियंते उपस्थित होते. शहरात सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्यास या कामांची सहा महिन्यांनी त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करण्यात येईल. पदाधिकारी कुणाकडूनही पैशांची मागणी करत नाही, त्यामुळे गुणवत्ता राखली जावी, अशी सूचना उपमहापौर सुनील महाजन यांनी केली. तसेच उपस्थित अधिका-यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. आमदार, खासदार फंडाप्रमाणे पालिका फंडातील कामेही करण्याची मागणी खडके यांनी केली.