आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorized Construction, Latest News In Divya Marathi

अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा मुद्दा ऐरणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नेहरू चौकालगत असलेल्या सिटी सव्र्हे नंबर 2116 या भूखंडातील खुल्या भूखंडावर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. तसेच या कामात कुचराई केल्याने नगररचना सहायकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, पुढील कारवाईचे आदेश नगररचना सहायक संचालकांना देण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी आयुक्तांशी चर्चा केल्यावर आणि विहित कार्यपद्धतीचा वापर करूनच कारवाई करणार असल्याचे संकेत नगररचना सहायक संचालकांनी दिले आहेत.
सव्र्हे नंबर 2116मधील 413.94 चौरस मीटर जागेत दोन ठिकाणी बांधकाम केले आहे. या जमिनीचे मालक म्हणून ‘खान्देश स्पिनिंग अँण्ड विव्हिंग मिल्स कंपनी लिमिटेड’ यांचे कागदोपत्री नाव आहे. 29 डिसेंबर 1983 रोजी या जागेवरील अतिक्रमण तीन महिन्यांत पाडण्याच्या अटीवर तेथील ले-आऊटला मंजुरी दिली होती. याप्रकरणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, या भागातील रहिवासी, विभागीय आयुक्त आणि पोलिसांच्या पत्रांचा संदर्भ देऊन अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश आयुक्तांनी 1 जून रोजी दिले होते. मात्र, या आदेशाचे पालन न केल्याने नगररचना सहायक जयंत शिरसाठ यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे पुढील कारवाईचा चेंडू नगररचना विभागाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे आयुक्तांशी चर्चेनंतरच याप्रकरणी कारवाईचा निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागेशी संबंध नसल्याचे वाणींचे पत्र
महापालिकेने 2 एप्रिल 2011 रोजी दिलेल्या नोटिशीला उत्तर देताना जगन्नाथ वाणी यांनी खुलासा सादर केला आहे. या ले-आऊटपैकी मी एक प्लॉट विकत घेतला आहे. खुल्या भूखंडाची माहिती मूळ मालकांना आहे. मात्र, वाद न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत कारवाई न करण्याचे पत्र त्यांनी 13 एप्रिल 2014 रोजी दिले होते.