आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते अधिकारी येताच झाले गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भुसावळ विभागाचे एडीअारएम अरुण धार्मिक अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी येथील रेल्वेस्थानकाला अचानक भेट दिली. साधारणत: तीन तास त्यांनी बारकाईने फलाटांची पाहणी केली. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक पाहणीसाठी येत असल्याची माहिती मिळाल्याने अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी धूम ठाेकली.
रेल्वे प्रशासनातर्फे मध्यंतरी दाेन राेड-शाे घेण्यात अाले. त्यात स्थानकावरील प्रवासी सुविधांबाबत प्रचंड नाराजीचा सूर उमटला. या पार्श्वभूमीवर एडीअारएम अरुण धार्मिक, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक नरपतसिंग, रेल्वे सुरक्षा बलाचे अायुक्त चंद्र माेहन मिश्र, ए. के. सिंग, मुख्य चिकित्सा अधिकारी ए. के. कश्यप, वरिष्ठ दूरसंचार अधिकारी मनाेज साेनी, इलेक्ट्रिक मंडळ अभियंता एन. जे. निमजे, दिनेश गजभिये, श्याम कुळकर्णी, स्थानक व्यवस्थापक अार. के. कुठार, मुख्य वाणिज्य निरीक्षक प्रकाश ठाकूर, जीवन चाैधरी, शैलेश पारे, एस. एम. कडुसकर, अारपीएफ निरीक्षक विनाेदकुमार लांजीवार यांनी शुक्रवारी पाहणी दाैरा केला. त्यात फलाटावर पाय ठेवताच अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी धूम ठाेकली.

फलाटांची पाहणी : पथकानेफलाट क्रमांक सहा चारची सर्वप्रथम पाहणी केली. प्रवाशांना बसण्यासाठी असलेली अासन व्यवस्था, पंखे, दिवे, गाडीचे डबे दर्शवणारे डिजिटल फलक अशा विविध सेवासुविधांचा त्यांनीअाढावा घेतला. पाहणी दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर दाेन्ही फलाट नेहमीपेक्षा अधिक चकाचक असल्याचे दिसून अाले. फलाट क्रमांक तीनवरील कँटिंगची पाहणी करून एडीअारएम धार्मिक वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक मिश्रा यांनी या वेळी मार्गदर्शक सूचना दिल्या.

रेल्वेस्थानकाची पाहणीकरण्याचा कृती अाराखडा तयार करण्यात अाला अाहे. त्यानुसार प्रवाशांना सुविधा मिळतात की नाही? याचा अाढावा घेऊन संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी सरप्राइज व्हिजिट देण्यात अाली. ज्या ठिकाणी त्रृटी अाढळल्या त्या दूर करण्याचे सूचित केले. प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांचा अाढावा घेतला. -अरुण धार्मिक, एडीअारएम,भुसावळ

प्रवाशांच्या साहित्याची तपासणी
रेल्वे स्थानकावर विविध ठिकाणी पाहणी करत असताना पथकाने एका प्रवाशाच्या साहित्याची तपासणी केली. काेठून अाले, कुठे जात अाहेत, पिशवीत काय अाहे? याची माहिती एडीअारएम धार्मिक यांनी स्वत: घेतली. स्थानकाच्या दाेन्ही प्रवेशद्वारासह फालाटावरील सुरक्षेची माहिती अारपीएफ अायुक्त चंद्र माेहन मिश्र यांच्याकडून जाणून घेतली. प्रातिनिधीक स्वरुपात त्यांनी स्थानकावर बसलेल्या प्रवाशांसाेबत चर्चा केली.

कव्हर शेडचे काम पूर्ण करा
फलाट क्रमांक एकवरी कव्हरशेडचे काम सुरू अाहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामाला गती देऊन ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात अाल्या. स्थानकावरील रिटायरिंग रूमचीही पाहणी करण्यात अाली. नवीन पादचारी पुलाच्या कामाचाही अाढावा घेण्यात अाला. फलाट क्रमांक दाेनवर नळाला गळती लागल्याने रेल्वेरूळांत अस्वच्छता असल्याचे लक्षात अाल्याने पथकाने नळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या.
बातम्या आणखी आहेत...