आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत मोबाइल टॉवरला आता दुप्पट दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात विनापरवानगी तसेच ना-हरकत दाखला घेता माेबाइल टाॅवर उभारल्यास अाता दुपटीने दंड अाकारला जाणार अाहे. दंडाची रक्कम एक लाख रुपयांवरून दाेन लाख रुपये करण्याचे अादेश महापालिका प्रशासनाने नगररचना विभागाला दिले अाहेत. त्यानुसार महापालिकेने शहरातील काही मोबाइल टॉवरधारकांना नोटिसा दिल्या आहेत. त्यात त्रुटी अाढळल्या तर दंड वसुली केली जाणार अाहे.

शहरात मोठ्या प्रमाणात मोबाइल टॉवर उभारण्यात आले अाहेत. या मोबाइल टॉवरधारकांकडून मालमत्ता कर वसूल केला जाताे. टाॅवर उभारण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. टॉवरधारकांसाठी शासनाने नवीन नियमावली तयार केली आहे. मालमत्ता कराची थकबाकी असेल तर मोबाइल टॉवर सील करण्याची कारवाई हाेणार आहे. यापूर्वी उभारण्यात अालेल्या मोबाइल टॉवरधारकांकडून एक लाख रुपये दंड ३० हजार रुपये प्रशासकीय शुल्क घेण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार ५५ मोबाइल टॉवरधारकांनी ही रक्कम महापालिकेत जमा केली आहे. उर्वरित मोबाइल टॉवरधारकांनी ही रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. त्या अनुषंगाने आता मोबाइल टॉवरधारकांकडून एक लाख रुपयांऐवजी दाेन लाख रुपये घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या दिवसापासून मोबाइल टॉवर उभारला, त्या दिवसापासून या रकमेवर १८ टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. यासह एका मोबाइल टॉवरवर इतर कंपन्यांचे शेअरिंग असल्यास प्रत्येक शेअरिंगसाठी प्रत्येकी एक लाख रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रशासकीय फी ३० हजार दंडात्मक रक्कम २० हजार रुपये आकारण्यात येणार आहे. महापालिकेने मोबाइल टॉवरबाबतचे धोरण नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता कठाेर केले आहे. शहरात उभारल्या जाणाऱ्या मोबाइल टॉवरबाबत संबंधितांना नियमांच्या अधीन राहून ना-हरकत दाखला देण्यात आला आहे. त्यासाठी मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. त्यासाठी वसुली होत आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता या रकमेत प्रशासनाने वाढ केली आहे. या वाढीव रकमेतून महापालिकेला उत्पन्न प्राप्त होणार आहे.

माेबाइल टाॅवरला जागा देताना केवळ परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांंपुरते हे प्रकरण ठेवायला नकाे तर त्याचे निकष अाणखी कडक करायला हवे. त्याशिवाय टाॅवर उभारताना कंपन्या जागामालक काळजी घेणार नाही. शहराच्या उपनगरांमध्ये सहसा काेणाचाही विराेध हाेत नसेल, अशा ठिकाणी हे टाॅवर उभे केले जातात.

अनधिकृत टाॅवर शाेधण्याचे अाव्हान
शहरात बहुतांश ठिकाणी अनधिकृत माेबाइल टाॅवर उभारण्यात अाले अाहेत. त्यांची तपासणी अद्याप झालेली नाही. हे टाॅवर शाेधण्याचे अाव्हान प्रशासनासमाेर अाहे. मुळात परवानगी घेतलेली नसेल तर ज्यांच्या जागेवर टाॅवर उभारला जाणार अाहे त्यांनी तरी किमान त्याची चाैकशी करणे गरजेचे असते. मात्र, जागाधारकही चाैकशी करत नाहीत. त्याचबराेबर काही ठिकाणी एकापेक्षा जास्त टाॅवर उभारण्यात अाले अाहेत. त्याचीही तपासणी प्रशासनाने करायला हवी.