आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धडक कारवाईत सातशेवर अवैध नळ कनेक्शन बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात ज्यांनी अवैध नळ कनेक्शन घेतले आहे त्यांनी अापले कनेक्शन वैध करून घ्यावे यासाठी महापालिका प्रशासनाने नोटीस दिली होती; परंतु त्यानंतरही अनेकांनी नळ कनेक्शन वैध केले नाही. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने काल शनिवारी ७१५ अवैध नळ कनेक्शन बंद केले आहेत.
शहरातील अनेक भागातील नागरिकांनी महापालिकेची परवानगी घेता नळ कनेक्शन घेतले आहे. काही जलवाहिन्यांवर क्षमतेपेक्षा जास्त नळकनेक्शन असल्याने शेवटच्या घरापर्यंत योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्याचबरोबर अवैध नळ कनेक्शनमुळे महापालिकेचे अार्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ज्यांच्याकडे अवैध नळकनेक्शन आहे त्यांनी ते वैध करून घ्यावे यासाठी नोटीस बजावण्यात आली होती; परंतु अनेकांनी या नोटिशीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे काल शनिवारी महापालिकेचे शाखा अभियंता चंद्रकांत उगले यांच्या पथकाने चाळीसगाव रोड परिसरात अवैध नळ कनेक्शन बंद केले. त्यात अलहेरा हायस्कूल पाठीमागील भागातील ८६, जामचा मळा परिसरातील ३१०, ड्रायव्हर सोसायटीतील ६६, बोरसे कॉलनीतील ४६, मुल्ला कॉलनीतील ७८, गरीब नवाज नगर वसाहतीतील ४८, पूर्व हुडको अतिक्रमण भागातील ८१ नळ कनेक्शनचा समावेश आहे. या मोहिमेत शाखा अभियंता भूषण ढवळे, फिटर सुभाष बनकर, हमीद शहा, सय्यद शाह आदी सहभागी झाले. वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या चार पथकांनी १८ लाख ८५ हजारांचा मालमत्ता कर पाणीपट्टीही वसूल केली. त्याचबरोबर दोन मालमत्ता सील केल्या. थकित पाणीपट्टीपोटी चारही पथकांनी शनिवारी लाख ९९ हजार, विकास शुल्क इतर करापोटी लाख ५७ हजार ५६१ रुपये, दुकान भाड्यापोटी लाख ५८ हजार, एलबीटी कराचे लाख ५८ हजार रुपये वसूल करून ते महापालिकेत जमा केले. ही मोहीम आयुक्त संगीता धायगुडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त रवींद्र जाधव, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली.

उत्पन्न कमी आणि खर्च अधिक
महापालिकेतर्फे पाणीपुरवठ्यावर दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. तापी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर सर्वाधिक निधी खर्च होत आहे. त्या तुलनेत पाणीपुरवठ्यातून मिळणारे उत्पन्न अतिशय कमी आहे. त्यामुळे ते वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून यापूर्वी पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पन्नात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

तापी योजनेमुळे खर्चात वाढ
तापीनदीवर सुलवाडे बॅरेजचे काम झाल्याने नदीत बाराही महिने पाणी असते. त्यामुळे तापी पाणीपुरवठा योजना आता बारमाही झाली आहे. त्यामुळे शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली अाहे. मात्र, या योजनेच्या वीजबिलापोटी महापालिकेला महिन्याला लाखो रुपये भरावे लागतात. त्यामुळे मध्यंतरी या याेजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदार नेमण्याचा प्रस्ताव पुढे आला होता.
बातम्या आणखी आहेत...