आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूमिगत वीजवाहिनीसाठी ७० कोटी रुपये मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- क्रॉम्प्टनच्याकाळात शहरातील विजेसंदर्भातील कामांसाठी तयार करण्यात आलेला २० कोटींच्या ऐवजी सुधारीत ७० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. यातून शहरातील गर्दीच्या ठिकाणी भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासह वाढीव चार सब स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागी असलेले विजेचे खांबे हलवण्याचे कामही अजेंड्यावर असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गणेशोत्सव काळात शहर भारनियमनमुक्त राहणार असल्याचेही ते म्हणाले.
शहरातील महावितरण कंपनीशी निगडित विविध कामांबाबत गेल्या तीन वर्षांपासून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावर क्रॅम्प्टनकडून कोणताही पाठपुरावा झाला नव्हता. आता पुन्हा महावितरण कंपनीने कामकाज हाती घेतले आहे. यासंदर्भात शहराच्या दृष्टीने गरजेच्या कामांवर चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात आमदार भोळे यांच्या उपस्थितीत महावितरणचे अधिकारी, सर्वपक्षीय गटनेते पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. या वेळी महापालिका महावितरणचे अभियंते तसेच शहरातील लोकप्रतिनिधी यांनी शहराचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महावितरणकडून कोणत्या समस्यांचा निपटारा व्हावा, याचा अहवाल तयार केला जाणार आहे. विजेच्या दृष्टीने शहराला महावितरणकडून सुमारे १७० कोटींच्या कामांची आवश्यकता आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात ७० कोटी रुपये मिळतील, अशी आशा आमदार भोळे यांनी व्यक्त केली.

भारनियमनाची समस्या सोडवणार
शहरातीलअनेक भागात भारनियमन होत असते. बऱ्याचदा प्रामाणिकपणे बिल भरूनही त्रास सहन करावा लागतो. याला कारण वीज चोरीचे वाढलेले प्रमाण आहे. यात मार्ग काढण्यासाठी शहरात नव्याने ४० ते ५० ट्रान्सफॉर्मर नव्याने बसवण्यात येणार आहेत. यामुळे लहान लहान भाग करून भारनियमन टाळता येणे शक्य होईल. त्याचप्रमाणे बऱ्याच वर्षांपासून विजेचे खांब बदलण्यात आलेले नाहीत. तसेच रस्ता रुंदीकरणात पोल रस्त्यातच आहेत. त्यात विजेच्या तारसुद्धा लोबकळतात. यातून अनेकदा अपघातही होतात. गर्दींच्या ठिकाणी वीजवाहिन्या जमिनीतून टाकण्यात येणार आहेत. शहराचा विस्तार वाढल्याने नवीन भागात पोल उभारून स्ट्रीट लाइटची सुविधा देण्यात येणार आहे. ही सर्व कामे केंद्र राज्याचा निधीतून आयएसडीपी योजनेतून महावितरण करणार आहे. त्यासाठी सुमारे ७० कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.

गणेशोत्सवात भारनियमन होणार नाही
शहरातगणेशोत्सव काळात भारनियमन केले जाणार नाही. याबाबत कोमदार भोळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गणेशोत्सव हा सगळ्यांच्या उत्साहाचा काळ असल्याने आनंदात विरजण टाकण्याचा निर्णय घेतला जाणार कोहे. यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.