आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे समजून लांबवली चक्क बंदुकीची बॅग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एटीएममध्ये पैसे भरण्यास अालेल्या एका खासगी कंपनीच्या सुरक्षारक्षकांची बंदुकीची बॅग चक्क पैशांची समजून चाेरट्यांनी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता नटवर मल्टिप्लेक्स शेजारील बँक अाॅफ इंडियासमाेरून लांबवली हाेती. त्यामुळे बॅक अधिकाऱ्यासह पाेिलस तणावात सापडले हाेते. स्थािनक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी ४.३० वाजता ही बंदूक शाेधून काढली अाहे.

शहरातील बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचा ठेका सीएमएस या खासगी कंपनीकडे अाहे. या कंपनीला जगदीश बाविस्कर (रा.रायसाेनीनगर) यांची मारुती कारगाे व्हॅन (क्रमांक एमएच-१९-बीएम-०४९७) भाड्याने लावलेली अाहे. मंगळवारी सकाळी १० वाजता एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी चालक रवींद्र रमाकांत जाधव (रा. तुळजाईनगर), माजी सैनिक असलेले सुरक्षारक्षक राजेश बाेरसे (रा. धरणगाव), कस्टाेडीयन दीपक पाटील अाणि नीलेश अहिरे हे चाैघे गेले हाेते. प्रथम त्यांनी पालिकेच्या शाहू महाराज हाॅस्पिटलसमाेरील अायसीअायसीअाय बँकेतून पैसे घेऊन एटीएममध्ये भरले. त्यानंतर ते सकाळी १०.३० वाजता नटवर मल्टिप्लेक्सशेजारील बँक अाॅफ इंडियाजवळ अाले. या वेळी बाेरसे, पाटील अाणि

परिसरात दुसरी चाेरी
नटवरमल्टिप्लेक्स परिसरात लक्ष विचलित करून बॅग लांबवल्याची मंगळवारी दुसरी घटना घडली. डिसेंबर महिन्यात धरणगाव तालुक्यातील एक जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाला तुमचे पैसे पडल्याचे सांगून त्यांच्या गाडीवरील पैशांची बॅग लांबवली हाेती. मंगळवारीदेखील अशीच पद्धत चाेरट्यांनी अवलंबली.

याच व्हॅनमधून बंदूक चोरली होती.
१४ एटीएममध्ये भरले जातात पैसे
मंगळवारीसकाळी ज्या व्हॅनमधून बॅग चाेरली गेली. त्या गाडीतून दरराेज सकाळी १० ते वाजेपर्यंत १४ एटीएममध्ये दरराेज पैसे भरण्याचे काम केले जाते. व्हॅन दरराेज सकाळी १०.३० ते ११ वाजेदरम्यान बँक अाॅफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी येतात. याबाबत सखाेल माहिती घेऊन चाेरट्याने नियाेजनबध्द व्हॅनमधून बॅग लांबवली असल्याचा अंदाज पाेिलसांनी व्यक्त केला हाेता.