आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविकसित १५० जागा पालिका ताब्यात घेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेची मालकी असलेल्या ३९७ खुल्या जागांपैकी सुमारे १५० जागांचा अद्याप विकासच होऊ शकलेला नाही. त्यामुळे या जागांवर ताबा असलेल्या संस्थांना आता महापालिका नोटीस देणार असून त्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.

मनपाच्या मालकीच्या बऱ्याच जागांवर व्यावसायिक वापर सुरू आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५९ जागांची माहिती घेऊन कार्यवाही सुरू केली होती. त्यानंतर सर्वच्या सर्व ३९७ जागा ताब्यात घेण्यासाठी करार रद्दचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, या जागांबाबत समिती स्थापन करून त्यासंदर्भात महासभेत निर्णय घेण्यात आला होता. आता ज्या जागांवर बांधकाम करून वापर सुरू आहे, अशा जागांबाबत समिती स्थापन व्हायची बाकी आहे. तीन महिने उलटूनदेखील कोणतीच प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे नगररचना विभागाने ज्या जागा संस्थांना दिल्या त्या संस्थांनी अद्यापही त्या जागांचा वापर सुरू केलेला नाही अशा १५० जागा ताब्यात घेण्यात येणार आहे.

४९६ फेरीवाल्यांची नोंदणी होणार रद्द
मनपाक्षेत्रात नोंदणी केल्यानंतरही फी भरणाऱ्या ४९६ फेरीवाल्यांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. तसेच २८ आॅगस्ट रोजी होणाऱ्या फेरीवाला समितीच्या सभेत यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सभेत याबाबत निर्णय झाला होता. त्यानुसार ९५० फेरीवाल्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी सुमारे १५० जणांनी लाख रुपये भरले आहेत. त्यामुळे त्यांना बजावलेल्या नोटिसा रद्द करण्यात आल्या आहेत. आता ४९६ फेरीवाल्यांची नोंदणी रद्द करण्यात येणार असून, त्यांच्याऐवजी जे व्यवसाय करतात; परंतु नोंदणी केलेली नाही अशांची नोदणी करून घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त प्रदीप जगताप यांनी दिली.