आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी नाट्यसंमेलन जळगावात! नाट्य परिषदेचे अध्यक्ष माेहन जाेशी यांचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावच्या नाट्य परिषदेच्या पाठीशी मी उभा अाहे. अखिल भारतीय नाट्यसंमेलन हाेण्यासाठी नियामक मंडळाकडे प्रस्ताव द्यावा लागताे. त्यासाठी पाठपुरावा केला अाणि पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी ही मागणी लावून धरली, तर जळगावात अखिल भारतीय नाट्यसंमेलन होऊ शकते. यास माझी वैयक्तिक काहीही हरकत नसून, उलट हे नाट्यसंमेलन खान्देशच्या अहिराणी बाेलीभाषेच्या मातीत व्हावे, अशी माझी इच्छा अाहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष माेहन जाेशी यांनी व्यक्त केले. तसेच यासंदर्भातील प्रस्तावही रोहिणी खडसे-खेवलकर यांनी दिल्याने आगामी सन २०१७चे नाट्यसंमेलन जळगावात हाेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

जिल्हा बँकेच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुक्ताईनगर ग्रामीण शाखेचे उद्््घाटन शनिवारी अभिनेते जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. महसूलमंत्री एकनाथ खडसे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, सदस्य अभिनेते दीपक करंजीकर, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, सुनील ढगे, धुळे जिल्हा नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील नेरकर, ‘महानंद’च्या चेअरमन मंदा खडसे, खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, अामदार सुरेश भाेळे, स्मिता वाघ, किशाेर पाटील, संजय सावकारे, महापाैर नितीन लढ्ढा, दिलीप वळवी अादी उपस्थित हाेते.

या वेळी पालकमंत्री खडसे म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी जळगावात माेठ्या प्रमाणात सांस्कृतिक चळवळ रुजली हाेती. ती काही काळापूर्वी थांबली हाेती. अाज ती अापल्याला पुन्हा उभारायची अाहे. जाणकार प्रेक्षक असेल तर कलेला उत्तम दाद मिळते. मीदेखील उत्तम जाण असलेला प्रेक्षक अाहे. शिवाजी नाट्यमंदिराबाहेर तास उभे राहून संगीत नाटके ितकीट काढून पाहिली असल्याचे त्यांनी अावर्जून सांगितले.

नाट्य परिषद ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा राेहिणी खडसे-खेवलकर यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, नाट्य परिषदेच्या माध्यमातून वर्षभरात नाट्यलेखन कार्यशाळा, नाट्य प्रशिक्षण शिबिर, बालनाट्य एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार असून, ही चळवळ पुणे मुंबईपर्यंत पाेहोचवायची अाहे. तसेच जळगावातील कलावंतांनी मतभेद िवसरून सहकार्य करावे. काेण कार्यकारिणीत अाहे अाणि काेण नाही, हे पाहू नका. सर्व मिळून रंगभूमीसाठी कार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचलन श्रद्धा शुक्ल यांनी तर क्षमा सराफ यांनी आभार मानले.

नाट्यकथाकथन सादरीकरण
यावेळी सुप्रिया प्राॅडक्शनचे ‘अामचं अापलं सेम असतं’ हा कार्यक्रम घेण्यात अाला. त्यात गंगाराम गवाणकर अाणि मधू कांबीकर यांनी अापला जीवनप्रवास उलगडला. नाट्य कथाकथन स्वरूपात हा प्रवास उलगडला. तर मधू कांबीकर यांनी ‘पाहू कुठवर वाट...’ या लावणीचा भाग सादर केला.

नवीन कार्यकारिणी जाहीर
याप्रसंगीअ.भा.नाट्य परिषद ग्रामीण शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी अॅड. राेहिणी खेवलकर, उपाध्यक्ष- सतीश देशमुख, प्रमुख कार्यवाह- सुनील पाटील, खजिनदार- संजय राणे, सहकार्यवाह- शमा सुबाेध, सदस्य- अस्मिता गुरव, अपर्णा भट, शंभू पाटील, मुकेश खपली, अंजली हांडे, याेगेश शुक्ल, चेतना नन्नवरे, अॅड. प्रवीण पांडे, विनीता नेवे, हेमंत पाटील वैभव मावळे यांचा समावेश अाहे.
एका गाण्यावर नृत्य सादर करताना तरुणी.
महाविद्यालय अाणि हाैशी रंगभूमीवर कलावंतांना अनेक माध्यमांद्वारे संधी उपलब्ध असतात. परंतु नाट्य क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी आणि व्यावसायिक रंगभूमीवर येण्यासाठी तरुणपीढीने स्पर्धेतून पुढे यावे, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते माेहन जाेशी यांनी पत्रकार परिषदेत दिला.अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या जळगाव ग्रामीण मुक्ताईनगर शाखेच्या उद््घाटनाप्रसंगी ते शनिवारी शहरात अाले हाेते. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, अाजपर्यंत जळगावला नाट्यसंमेलन झाले नाही. खूप वर्षांपूर्वी एकदा संमेलन झाले हाेते. तेही जिल्हा बँकेच्या सभागृहात झाले होते. त्यानंतर अाज जवळपास १२ वर्षांनंतर मी जळगावात येत असून या ठिकाणी ही नाट्य चळवळ रुजावी याकरिता निश्चितच नाट्य परिषदेचाही पाठिंबा असेल, असे ते म्हणाले.

कलावंतांना प्राेत्साहन देण्यासाठी अावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्व.निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अाजीवन निधी देऊन ५१ हजारांचा ‘जीवनगाैरव’ पुरस्कार ज्येष्ठ कलावंतांना देण्यात येणार अाहे. त्यासाठी २५ लाखांचा निधी देऊ, अशी घोषणा या वेळी खडसे यांनी केली. तसेच ५० काेटी रुपये खर्चाचे १,२०० अासनक्षमतेचे नाट्यगृह जानेवारीपर्यंत पूर्ण हाेणार अाहे. त्या माध्यमातून उत्तम नाटके कार्यक्रम घेतले जातील. तसेच राज्याचा लावणी महाेत्सव व्हावा यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुक्ताईनगर ग्रामीण शाखेचे उद्््घाटन
नाट्यसंमेलनासाठी मोहन जोशी यांना प्रस्ताव देताना रोहिणी खडसे, एकनाथ खडसे आदी.
नाट्य कथाकथन सादरीकरणात सहभागी (डावीकडून) दीपक करंजीकर, गंगाराम गवाणकर, मधू कांबीकर.