आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सी-सॅट पेपर सर्वसमावेशक असावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - यूपीएससी परीक्षेतील सी-सॅट पेपर दोनविषयी सध्या सुरू असलेल्या वादामुळे परीक्षार्थींमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. परीक्षा उंबरठ्यावर असल्याने सी-सॅट रद्द करावी, असा सूर परीक्षार्थींकडून उमटत आहे.
तर दुसरीकडे सी-सॅटमध्ये सर्व प्रादेशिक भाषांना स्थान देऊन ती सर्वसमावेशक केली पाहिजे, असा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांचा मतप्रवाह आहे.

सी-सॅट परीक्षेचे स्वरूप किचकट असून इंजिनिअरिंग व एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांना ते लाभदायी असल्याचे स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक तथा यूपीएससीच्या परीक्षार्थींचे म्हणणे आहे. सी-सॅट परीक्षेतील कॉम्प्रेहेन्शन या उपघटकात इंग्रजीचे हिंदीत सरळ भाषांतर केले जाते. ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही खूप अवघड जाते. ही पद्धतच किचकट असल्याने त्याचे थेट भाषांतर न करता हिंदीसाठी स्वतंत्र पर्याय निर्माण करावा. तसेच या पेपरचे स्वरूप सर्वसमावेशक असावे, अशी अपेक्षा परीक्षार्थींकडून व्यक्त केली जात आहे.
संभ्रमाचे वातावरण दूर केले पाहिजे
सी-सॅट परीक्षेविषयी सध्या हिंदी व इंग्रजी भाषिक असा वाद सुरू आहे. ही परीक्षा योग्य असून तिचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे. कोणताही निर्णय घेताना आततायीपणा होऊ नये, अशी अपेक्षा आहे. सी-सॅटमुळे स्पर्धा निर्माण झाली असून ती निकोप असायला हवी. प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला पाहिजे, असे मत परीक्षार्थी विशाल पवार याने व्यक्त केले आहे.

सी-सॅट परीक्षेचे स्वरूप असे
सी-सॅट पेपर-2 हा एकूण 200 गुणांचा आहे. त्यात 40 ते 50 टक्केप्रश्न म्हणजेच 100 गुण हे आकलन पर्यायावर असतात. इंग्रजी आकलनावर साधारण 10 तर, आकलनावर इतर प्रश्न असतात. बुद्धिमत्ता, गणित, डाटा, इंटरप्रिटेशन, डिसिजन मेकिंग (संवादकौशल्य) यावर आधारित प्रश्नही असतात. हिंदी भाषा तर किचकट असल्याने परीक्षार्थींना गुणवत्ता राखणे कठीण होते
.
प्रादेशिक भाषांना स्थान गरजेचे
प्रत्येक भागातील परीक्षार्थींना समोर ठेवून सी-सॅट या परीक्षेचे स्वरूप तयार केले पाहिजे. ते ठरवताना प्रादेशिक भाषांना स्थान दिले पाहिजे. आकलन या उपघटकातील हिंदी व इंग्रजीसाठी स्वतंत्र पर्याय हवा. इंग्रजीतून होणारे भाषांतर सहज आणि सोप्या पद्धतीने व्हावे. शैक्षणिक विषयात राजकारणाचा शिरकाव होऊ नये. परीक्षांचे महत्त्व अबाधित राहायला हवे.
प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, भुसावळ