आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्दू शाळा स्थलांतरावरून गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कोळीपेठेतील पालिकेची उर्दू शाळा क्रमांक 49 कोणतीही सूचना न देता स्थलांतरित करण्यात आली आहे. कोणतीही सूचना न देता हा निर्णय घेतल्याने पालकांनी शिक्षण बुधवारी मंडळ कार्यालयात आंदोलन करत प्रशासन अधिकार्‍यांना घेराव घालण्याचा प्रयत्‍न केला.
शहरातील मन्यारवाडा भागात पालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 49मध्ये पहिली ते सातवीचे वर्ग भरत होते. गतवर्षी पटसंख्येनुसार शिक्षक नियुक्ती करताना या शाळेत 114 पटसंख्या होती.
छायाचित्रणात ही पटसंख्या केवळ 68 आढळून आली. प्रत्येक वर्गात 20 विद्यार्थी या निकषानुसार ही शाळा खंडेरावनगरात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पडपडताळणी दिशाभूल करणारी असल्याचे पालकांनी प्रशासन अधिकारी व्ही. एस. महाजन यांना सांगितले. त्यामुळे स्थलांतराचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.