आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी डॉक्टर सरसावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २० जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी शहरातील डाॅक्टरांनी दिवसांत लाख ६० हजारांचा निधी गाेळा केला आहे. यातील तीन शहिदांच्या घरी जाऊन प्रत्येकी ६५ हजारांची मदतही देण्यात अाली.

उरी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट पसरली अाहे. त्यानंतर लष्कराने पीअाेकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यामुळे सैनिकांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र काैतुक हाेत असून देशाभिमानाचे वातावरण निर्माण झाले अाहे. सैनिक सीमेवर तैनात असतात म्हणून अापण सुखाची झाेप घेऊ शकताे. त्यामुळेच शहिदांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी करण्याचा विचार अार्या फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ. धर्मेंद्र पाटील यांनी साेशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला.

यात शहिदांच्या कुटुंबीयांना अार्थिक मदत देण्यासाठी अावाहन केले. सात दिवसांत सुमारे लाख ६० हजार रुपयांचा निधी फाउंडेशनकडे जमा झाला. यात जळगाव शहरातील दानशूर डाॅक्टरांनी एकूण निधीच्या ७५ टक्के रक्कम उभी करण्यास सढळ हाताने मदत केली. तसेच डाॅ. पाटील यांच्या मित्रपरिवारानेही हातभार लावला अाहे.
सैनिकांच्याबलिदानामुळे अापण सुरक्षित असताे. बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबीयाचे अापण काही देणे लागताे, या भावनेतून हा उपक्रम हाती घेतला अाहे. दानशूर व्यापारी, इंजिनिअर, वकील यांनीही सहभागी हाेऊन मदत करावी. - डाॅ.धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, अार्या फाउंडेशन.
प्रत्येक कुटुंबाला ६५ हजारांची मदत...
डाॅ.पाटील यांनी गांधी जयंतीचे अाैचित्य साधत अाॅक्टाेबर राेजी खडांगळी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील शहीद जवान संदीप साेमनाथ ठाेक यांच्या कुटुंबाची भेट घेतली. अाई विमल साेमनाथ ठाेक यांच्या नावे ६५ हजारांचा धनादेश सुपूर्द केला. त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर (ता. अमरावती) येथील विकास जानराव उईके नरेड (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील विकास जनार्दन कुळमेथे यांच्या कुटंुबीयांनाही ६५ हजारांचा धनादेश अाॅक्टाेबर राेजी दिला. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील शहीद चंद्रकांत शंकर गलंडे यांच्या कुटुंबालाही मदत पोहोचवली जाणार अाहेे.
बातम्या आणखी आहेत...