आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बराक ओबामांच्या कॅडिलॅक गाडीची प्रतिकृती जळगावात, भारतात एकमेव असल्याचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यानिमित्त त्याच्या बीस्ट आणि कॅडिलॅक डीटीएस या दोन अलिशान कारचीही चर्चा आहे. या दोन पैकी कॅडिलॅक डीटीएस या कारचे मॉडेल जळगावात आहे. मिनिएचर स्केल कार मॉडेल्सचा छंद असलेले अभियंता अभिषेक कौल यांच्या संग्रहात गेल्या दोन वर्षांपासून "कॅडिलॅक डीटीएस' ही कार आहे.
जगभरात या कार्सच्या एक हजार प्रतिकृती असून भारतात केवळ अभिषेक यांच्याकडेच ही प्रतिकृती अाहे.
ओबामांसाठी भारतात आलेल्या "कॅडिलक डीटीएस' कारची हुबेहूब प्रतिकृती अमेरिकेतील ‘लेगसी डायकास्ट’ या कंपनीची आहे. ती मूळ कारच्या ४३ पट छोटी आहे. तिच्या पुढील बाजूला ‘यूएसए वन’ हा नंबर आहे दोन ध्वज आहेत. उजव्या बाजूला अमेरिकेचा राष्ट्रध्वज, डाव्या बाजूला मान चिन्हाचे प्रतीक असलेला ध्वज आहे. मागच्या बाजूला दोन कार अँटिना आहेत.
१८संकल्पनेवर आधारलेला कार संग्रह
हासंपूर्ण कार संग्रह १८ प्रमुख संकल्पनेवर करण्यात अाला अाहे. ज्यात प्रत्येक प्रमुख कार कंपनीची पहिली कार (५५), राष्ट्राध्यक्षांच्या कार (१०), बंद पडलेल्या कार कंपन्या (१००), राजघराण्यातील प्रमुख (२५), विभाजनापूर्वीच्या रशियातील निर्माण झालेल्या कार (२२), वाहनाच्या उत्क्रांतीच्या सन १६७२ पासूनच्या पहिले स्वयंचलित वाहने अाणि लॅण्ड स्पीड रेकाॅर्ड कार या प्रुमख थीमवर संग्रह अाहे.
साडेतीन हजार कारचा संग्रह
तीनवर्षांचे असताना अभिषेकला गिफ्ट मिळालेल्या पहिल्या कारपासून संग्रहाला सुरुवात केली. अाता त्यांच्याकडे साडेतीन हजारांवर कारचे माॅडेल अाहेत. शालेय शिक्षण संपल्यापासून जगभरातील माॅडेल कार कंपन्यांकडून कार मागवल्या अाहेत.
10राष्ट्राध्यक्षांच्या कारचे माॅडेल
काैलयांच्या संग्रहालयात जगभरातील १० राष्ट्राध्यक्षांच्या कारच्या प्रतिकृती अाहेत. अमेरिकेच्या पूर्व राष्ट्राध्यक्षांच्या कॅडिलॅक , जर्मनीच्या अध्यक्षांच्या मर्सडिज, रशियाची बेटली, राेल्स राइस, फान्सची सिम्बा, जपानची टाेयाेटा अादी कारचा समावेश अाहे.
अभिषेक काैल यांच्या कडे बराक अाेबामा ची कार.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनडी यांची कारमध्ये हत्या करण्यात आली. त्या ‘एक्स १००’ या कारचाही समावेश अभिषेक यांच्या संग्रहात आहे. केनडी यांच्या हत्येनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वाहनाची सुरक्षा ही सर्वाेच्च सुरक्षेची बाब म्हणून पाहिली जाते.