आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: फाेनच्या मदतीने पंखे, लाइटचा वापर करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वाढणारे वीजबिल ही अनेकांची डाेकेदुखी असते. सुरू राहून गेलेल्या वीज उपकरणांमुळे येणाऱ्या बिलावर मार्ग काढण्यासाठी जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने ‘अायअाेटी’ हे उपकरण तयार केले अाहे. स्मार्ट फाेनशी संलग्न केल्यावर या उपकरणाच्या मदतीने घरात बसल्या-बसल्या, घरा बाहेरून, दुसऱ्या शहरातून अगदी परदेशातूनही वीज दिवे, टीव्ही, फ्रीज, एसी अादी सुरू किंवा बंद करता येणे शक्य झाले अाहे.

अमर राणे याने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून नुकताच ‘इलेक्ट्राॅनिक्स अॅण्ड टेलिकाॅम’ हा डिप्लाेमा पूर्ण केला अाहे. त्याने पंतप्रधानाच्या स्मार्ट सिटी डेव्हलपिंगच्या अावाहनाला प्रतिसाद देत हे उपकरण बनवले अाहे. ‘इंटरनेट अाॅफ थिंग्स’ अर्थात ‘अायअाेटी’हे उपकरण स्मार्ट फाेनला कनेक्ट करून अँन्ड्रॉइड अॅप्लिकेशनवरून विद्युत उपकरणाची हाताळणी करता येणार अाहे. या उपकरणामुळे विद्युत उपकरणे सुरू अाहेत की, बंद अाहेत. बाहेरगावी गेले असताना घरात टीव्हीचा, फ्रीजचा वापर सुरू अाहे का? हेदेखील जाणून घेता येणार अाहे.

अायअाेटीसाठी केवळ १५ हजार खर्च
अमेयलाअायअाेटी उपकरण तयार करण्यासाठी १५ हजार रुपयांचा खर्च अाला अाहे. त्याने डेमाे माॅडेल तयार केले अाहे. त्याला हे उपकरण तयार करण्यासाठी इलेक्ट्रोसाॅफ्ट सिस्टिमचे संचालक नीलेश वाघ राजेश ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले अाहे. अायअाेटीला अनेक विद्युत उपकरणे जाेडल्यास त्याचा खर्च कमी हाेऊ शकताे, असे अमेयचे म्हणणे अाहे.

उद्याेग, कृषीसाठीही उपयुक्त...
या टेक्नाॅलाॅजीचा वापर करून उद्याेग क्षेत्रातील बाॅयलर साेलेनाइट वाॅल यांच्या अाॅपरेटिंगसाठी उपयाेग हाेऊ शकताे, असा दावा अमेयने केला अाहे. त्यासाठी थाेड्या प्रमाणात उपकरणात बदल करावे लागणार अाहेत, असेही त्याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...