आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Use Of Modern Tools Spontaneous Participation In The Games

आधुनिक साधने वापराच्या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-आयएमआर महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये शनिवारी विविध स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील विषयांशी निगडित प्रयोगांचे सादरीकरण केले. अभ्यास, बुद्धिकौशल्य आणि मनोरंजन यांचा ताळमेळ साधत या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात ‘आयटी फेस्टा-2014’अंतर्गत सॉफ्टवेअर एक्झिबिशन, पेपर प्रेझेंटेशन आदी स्पर्धांचा समावेश होता. या वेळी ‘मॅनेर्जस डे’सुद्धा साजरा करण्यात आला. आयएमआरच्या कलागुणांच्या ‘सिनर्जी’ या संमेलनाचे पहिले पाऊल म्हणून पोस्टर प्रेझेंटेशनही घेण्यात आले.
आयटी फेस्टा-2014 : या दोनदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते. ‘सॉफ्टवेअर एक्झिबिशन’मध्ये सॉफ्टवेअर विकसित कसे करतात, हे प्रात्यक्षिकांद्वारे दाखवण्यात आले. त्यात 25 टीमने ऑनलाइन एक्झामिनेशन, रिमोट सिस्टीम अँडमिनिस्ट्रेशन युझिंग ई-मेल, स्टुडंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, क्विझ मॅनेजमेंट सिस्टीम यासारख्या प्रात्यक्षिकांचा समावेश होता. दीपेश मालाणी व चेतन कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ‘पेपर प्रेझेंटेशन’ ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, एमसीए, एमएस्सी, बीएस्सी, बीसीई व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी असते. त्यात विद्यार्थ्यांनी रिसर्च पेपर लिहून त्यांचे स्लाइड शोद्वारे सादरीकरण केले. क्लाऊड कॉम्प्युटिंग, ई-गव्हर्नन्स, मोबाइल कॉम्प्युटिंग यासारखे विषय हाताळत 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी नीता पाटील, स्नेहलता शिरोळे, कविता पाटील व स्वाती पाटील यांनी परीक्षण केले. त्यासाठी रंजना झिंझोरे, वर्षा पाठक, एस.एम.खान, उदय चतुर, मोनाली खाचणे, धीरज अमृतकर, राकेश राणे यांच्यासह एमसीएच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले.
मॅनेर्जस डे :
एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असते. त्यात स्ट्रॅटा गेम, ईएन विवो केस स्टडी कॉम्पिटीशन आणि कॉन क्विझ दी बिझनेस क्विझ या तीन स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन रेमंड कंपनीचे डेप्यूटी जनरल मॅनेजर राजीवकुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ.विवेक काटदरे, एमबीए समन्वयक बी.जे.लाठी, समन्वयक डॉ.पराग नारखेडे आदी उपस्थित होते. याअंतर्गत टीमवर्क, सॉफ्टस्किल्स, सकारात्मक वृत्ती कशी ठेवावी या विषयांशी निगडित स्पर्धा घेण्यात आल्या. अभ्यासक्रमात फक्त अभ्यासच नाही, तर प्रॅक्टिकल नॉलेजला व तुमचे बुद्धिचातुर्य तुम्ही कशा प्रकारे वापरता व त्याचे किती चांगल्या पद्धतीने सादरीकरण करतात यालाही महत्त्व असते. याच दृष्टीने या स्पर्धा घेण्यात आल्या. बक्षीस वितरणप्रसंगी डॉ.पी.आर.चौधरी, रुबी सर्जिकलचे केतन राणे उपस्थित होते. पूजा मंत्री यांनी सूत्रसंचालन केले, तर श्वेता चोरडिया यांनी आभार मानले.
चित्रांद्वारे केले स्पर्धांचे वर्णन
आयएमआर महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा ‘सिनर्जी-2014’ची या वेळी सुरुवात करण्यात आली. या सोहळय़ात 18 कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा यात सहभाग असतो. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कलाप्रकाराच्या विद्यार्थी समन्वयकाने आपापल्या कलाप्रकाराचे वर्णन चित्रांद्वारे केले होते. यात ट्रेझर हंट, रांगोळी, फेस पेंटिंग, अँडमॅड शो, हस्तकला, स्कीट, मिमिक्री, कुकिंग या विषयांचे पोस्टर्स लावले होते. या विद्यार्थ्यांना ‘सिनर्जी’च्या समन्वयक प्रा.शमा सुबोध, अनुपमा चौधरी, योगेश महाजन, डॉ.शुभदा कुलकर्णी, अनिल मार्थी, विशाल संदानशिवे, निशांत घुगे, विवेक यावलकर, मुरलीधर वायकोळे, समाधान बुंधे, ममता दहाड यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
सिनर्जी संमेलन। अभ्यास, बुध्दिकौशल्य आणि मनोरंजन यांचा ताळमेळ साधून विविध स्पर्धांचे आयोजन