आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Utava: Rakhi In Angree Bird, Spiderman, Chhota Bhim

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्सव: राख्यांमध्ये अँग्री बर्ड, स्पायडरमॅन, छोटा भीमची धूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बहीण भावाच्या अतूट नात्याला घट्ट करणार्‍या रक्षाबंधनाचा सण सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात महिला, मुली आपल्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. बाजारात रेशमी धाग्यांच्या राखीला मोठय़ा प्रमाणात मागणी असून, बच्चे कंपनीला विविध काटरून, छोटा भीम, अँग्री बर्ड, स्पायडरमॅन यासारख्या आकर्षक राख्यांनी मोहित केले आहे.


400 रुपयांपर्यंत राख्या
वर्षानुवर्षे होत असलेले पारंपरिक नक्षीकाम, कुंदन-कवड्यांवरील जरदोजी वर्क केलेल्या राख्या बाजारात येत आहेत. त्यामुळे राख्यांचे भावही वाढत आहेत. संध्या बाजारात 5 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत राख्या मिळत आहेत. तसेच 30 ते 500 रुपयांपर्यंतच्या चांदीच्या राख्याही सुवर्णकारांकडे मिळत आहेत.


लहानांच्या लक्षवेधक राख्या
रक्षाबंधनाचा सण जवळ आल्यामुळे बाजारात ठिकठिकाणी रंगीबेरंगी राख्या दाखल झाल्या आहेत. यात बच्चे कंपनीचे लक्ष वेधून घेणार्‍या विविध रंगांचे काटरून, छोटा भीम, अँग्री बर्ड, स्पायडरमन, फुलपाखरू यासह गणपती, राधा-कृष्ण यांच्या प्रतिकृती असलेल्या राख्या उपलब्ध होत आहेत.


विदेशात पाठवा राखी
विदेशात असलेल्या बंधुरायासाठी राखी पाठविण्याची व्यवस्था डाक विभागाने केली आहे. यासाठी स्वतंत्र पाऊच तयार करण्यात आले आहे. देशाचे अंतर व वजन यावर पाठवण्याचा खर्च अवलंबून आहे. दरवर्षी हे प्रमाण वाढत असून महिनाभरआधी राखी पाठवण्यास सुरुवात होत असल्याचे डाक अधीक्षक एस.एम.पाटील यांनी सांगितले.
रेशमी धाग्यासह शेकडो प्रकारांतील राख्या उपलब्ध आहेत. तसेच चांदीच्या प्रकारातील राख्यांनाही मागणी अधिक असते. लहान मुलांसाठी लाइटची राखी, बिबा, छोटा भीम या प्रकारातील राख्यांना मागणी आहे. दहा ते पाचशे रुपयांपर्यंत राख्यांचे भाव आहेत. तुषार शिंदे, करिष्मा राखी