आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhanda Helicopter Crash Two Solders From Jalgaon

शहीद जवानांमध्ये खान्देशातील दोघे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तराखंडातील गौरीकुंड येथे मंगळवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांमध्ये खान्देशातील दोघांचा समावेश असून त्यांचे पार्थिव गुरुवारी त्यांच्या गावी पोहोचेल. दोघेही भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे (आयटीबीपी) जवान होते आणि 2004 मध्ये जळगाव येथे भरती झाले होते.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या वडाळा-वडाळी गावातील गणेश हनुमंत अहिरराव (30) आणि धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील शशिकांत रमेश पवार (34) यांचा शहिदांमध्ये समावेश आहे. गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुधवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मान्यवरांची रिघ लागली होती.
गणेश अहिररावने सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास वडील हनुमंतराव यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला होता. शशिकांतने त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या घरी फोन लावून उत्तराखंडातील बचावकार्याची माहिती दिली होती. दोघांनीही तिथले वातावरण खराब असल्याचे आपल्या आप्तांना आवर्जून सांगितले होते. मंगळवारी दुपारी गौरीकुंड येथे हेलिकॉप्टरला अपघात होऊन 20 जवान शहीद झाल्याची बातमी दोन्ही कुटुंबांनी पाहिली होती; पण त्यात आपण या वीर पुत्रांना गमावले असेल अशी शंकाही त्यांच्यापैकी कोणाला आली नाही. बुधवारी सकाळीच दोन्ही कुटुंबीयांना ही दु:खद बातमी देण्यात आली.

गणेशची पत्नीही रुग्णालयात
गणेशचा पार्थिव डेहराडूनला आणण्यात आला असून त्याची डीएनए चाचणी सुरु आहे. गुरुवारी सकाळी नवी दिल्लीहून औरंगाबादला त्याचा पार्थिव येणार आहे. गणेशच्या मृत्यूचा त्यांचा पत्नीला जबर धक्का बसला असून, तिलाही सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- राहुल अहिरराव, गणेशचा आयटीबीपीएफमधील मित्र.