आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा.व्ही.जी.पाटील खून खटल्यातीन दोन्ही डॉक्टरांनी घेतले अटकपूर्व जामीन अर्ज मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -प्रा.व्ही.जी.पाटील खून खटल्यात जिल्हा न्यायालयाने डॉ.उल्हास पाटील व डॉ.जी.एन.पाटील यांना सहआरोपी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिल्यामुळे दोन्ही डॉक्टरांनी उच्च न्यायालयात दाखल केलेले अटकपूर्व जामिनासाठीचे अर्ज मंगळवारी मागे घेतले.
जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळाली असल्यामुळे आता दोन्ही डॉक्टरांना अटक होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. तत्पूर्वी त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केले होते. आता या अर्जांचा काहीच उपयोग नसल्यामुळे डॉ. उल्हास पाटील यांच्यातर्फे अँड.संगीत आणि डॉ.जी.एन.पाटील यांच्यातर्फे अँड. ओस्तवाल. यांनी जामीनअर्ज मागे घेतले. फिर्यादी रजनी पाटील यांच्यातर्फे अँड.सुदर्शन साळुंखे यांनी काम पाहिले.