आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा सिद्ध करण्यासाठी वकिलांचा लागला कस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- व्ही.जी.पाटील यांचा खून झाल्यानंतर चार दविसांत राजू माळी आणि राजू सोनवणेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे दोन महनि्यांनी सीआयडीने त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. यानंतर हा गुन्हा सिद्ध करण्याचा प्रवास सुरू झाला.
सुनावणीदरम्यान पंच साक्षीदार फितूर होणे, लॅबचा रिपोर्ट नकारार्थी येणे असे दोन टर्निंग पॉइंट आले होते. त्याचा फायदा संशयितांना मिळणार होता, मात्र वकिलांनी शक्कल लढवत गुन्हा सिद्ध करण्याच्या दिशेने न्यायालयाला पर्यायी पुरावे त्या वेळी उपलब्ध करून दिले होते.

मारेकरी अटकेत होते. साक्षीदार, पंच, तपासाधिकारी या सर्वांकडून मिळालेली माहिती, पोलिस तपास या कागदपत्रांच्या आधारे सीबीआयचे सरकारी वकील डी.एन. साळवी त्यांचे मदतनीस अॅड. निखिल कुळकर्णी आणि रजनी पाटील यांनी नियुक्त केलेले खासगी वकील सुदर्शन साळुंके त्याचे मदतनीस अॅड. विलास कदम यांचा कस लागला होता.

सुनावणीदरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या चाकू जप्तीच्या पंचनाम्यातील दोन पंच फितूर झाले. प्रा. पाटील यांचा मृतदेह आणि घटनास्थळावर आढळून आलेल्या रक्ताच्या नमुन्याचा रक्तगट तपासल्यानंतर अहवाल मिळता-जुळता नव्हता. या दोन घटनांमुळे सरकार पक्षावर प्रचंड तणाव आला होता. नेमक्या याचवेळी वकिलांनी अनुभवाचा कस लावत बाजू भक्कमपणे मांडण्याची कामगिरी केली आणि आरोपी राजू सोनवणेच्या विरोधात गुन्हा सिद्ध झाला.
चाकू जप्तीचे पंच झाले फितूर

प्रा. पाटील यांचा रक्तगट मिळत नव्हता
मृत प्रा. पाटील यांचा मृतदेह, रक्ताने माखलेले कपडे घटनास्थळी पडलेले रक्त हे त्यांचेच असल्याचा पुरावा मिळणे महत्त्वाचे होते. यासाठी या रक्ताचे नमुने केमिकल अॅनलायझर लॅबोरेटरीकडे (रासायनिक पृथक्करण प्रयोगशाळा) पाठवण्यात आले. हे नमुने व्ही.जी. पाटील यांच्या रक्तगटाशी मिळते-जुळते असल्याचे सांगता येत नाही, असा अहवाल लॅबने पाठवला होता. सरकार पक्षासाठी ही निराशाजनक बाब होती. याच वेळी मृत प्रा. पाटील यांचा मुलगा प्रणव याने न्यायालयात स्वत:सह प्रा. पाटील यांचे ड्रायव्हिंग लायसन्स सादर केले. त्यावर दोघांचा रक्तगट सारखाच होता. ड्रायव्हिंग लायसन्स हे पब्लिक डॉक्युमेंट असल्यामुळे दोघांचे रक्तगट मिळते-जुळते असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला. त्यामुळे ते रक्ताचे नमुने प्रा. पाटील यांचेच असल्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले.