आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघूर प्रकरणी आज जळगावच्या आजी-माजी नगरसेवकांचे जबाब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाघूर पाणीपुरवठा योजनेप्रकरणी दाखल गुन्ह्याची फाइल पोलिसांनी उघडली आहे. या प्रकरणाशी संबंधित संशयित आजी-माजी तीन नगरसेवकांना गुरुवारी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत बच्छाव यांच्याकडे जबाब देण्यास बोलावण्यात आले आहे.

नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत कापसे आणि चुडामन पाटील यांना गुरुवारी पोलिस मुख्यालयात हजर राहण्याच्या नोटीस मंगळवारी देण्यात आल्या. त्यानुसार ते गुरुवारी जबाब देण्यास हजर राहतील. त्या पाठोपाठ शुक्रवारी विजय रामदास वाणी, डी.डी.वाणी, लक्ष्मीकांत चौधरी आणि शनिवारी अजय जाधव, वासुदेव सोनवणे आणि शांताराम सपकाळे यांना बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात योजनेची बेकायदेशीर अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेत कट रचून ठराव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्या टर्ममधील सर्व नगरसेवक, नगरपालिकेचे अधिकारी या सर्वांचे जबाब घेतले जाणार आहेत. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बच्छाव यांनी दिली आहे.