आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरास पाणीपुरवठा होणार्‍या वाघूर धरणाच्या परिसरातील मुख्य जलवाहिनीवर वॉटरमीटर बसवण्यासह इतर दुरुस्तीची कामे मंगळवारी हाती घेण्यात आली. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठय़ाचे रोटेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे.
वाघूर धरणाजवळील मुख्य वाहिनीवर वॉटरमीटर बसवण्याच्या कामास मंगळवारी दुपारी सुरुवात झाली. तसेच वाघूर येथील विद्युत मोटार दुरुस्ती, गिरणा टाकीवर वॉटरमीटर बसवणे, क्रॉम्प्टन कंपनीतर्फे वाघूर पंपिंग स्टेशनवर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, वाघूर एक्स्प्रेस फीडरवरील वीजतारांना अडथळा ठरणार्‍या वृक्षांच्या फांद्या छाटणे अशी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे बुधवारी पूर्ण होण्याची शक्यता असल्याने शहराचे पाणीपुरवठय़ाचे रोटेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले असल्याचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवारचा पाणीपुरवठा
नटराज टॉकीज ते चौघुले मळ्यापर्यंतचा भाग, शनिपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ, हाऊसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल, हुडको, भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, जुने जळगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज परिसर, ओंकारनगर, जोशीपेठ, गणेशवाडी, क ासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रीम कॉलनी परिसर, प्रभात कॉलनी, ब्रुक बॉण्ड कॉलनी परिसर व मेहरूण गावठाण भागात गुरुवारऐवजी शुक्रवारी पाणीपुरवठा होऊ शकतो.

शनिवारी होणारा पाणीपुरवठा
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, असोदा रोड व परिसर, मेहरूणमधील रामेश्वर कॉलनी, एमडीएस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सानगर, अयोध्यानगर, मोहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण, मानराज पार्क, दांडेकरनगर, आसावानगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, शिवाजीनगर, हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर, जिल्हापेठ रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, योगेश्वरनगर, हिरा पाइप व खेडी गाव या परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा झाला होता. पुढील रोटेशन शुक्रवारऐवजी शनिवारी होऊ शकते.

गुरुवारचा पाणीपुरवठा
पिंप्राळा गावठाणचा उर्वरित भाग, हुडको, सेंट्रल बॅँक कॉलनी, आशाबाबानगर, शिंदेनगर, अष्टभुजानगर, वाटिकार्शम, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिरा-शिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, दत्तनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर, हॅपी होम कॉलनी, लक्ष्मी पार्क, ऑटोनगर, र्शीनगर, पोल फॅक्टरी, साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, तांबापुरा, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिव कॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्णनगर या परिसरात बुधवारी पाणीपुरवठा न होता गुरुवारी होऊ शकतो.