आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामात हलगर्जीपणा; दोन तलाठी निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - आम आदमी विमा योजनेसाठी एक वर्षापूर्वी अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना तालुक्यातील त्यानंतरही या कामाकडे दुर्लक्ष केल्याने कानळदा येथील तलाठी एस. बी. साबळे आणि नेर येथील तलाठी एस. जे. कोठावदे यांना निलंबित करण्यात आले आहे.

शासनाच्या आम आदमी विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी तालुक्यातील सर्व तलाठय़ांना अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी, अडीच एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले बागायतदार शेतकर्‍यांच्या स्वतंत्र याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वर्षभरापूर्वी तलाठय़ांना देण्यात आलेल्या सूचनांचे कानळदा येथील तलाठी एस. बी. साबळे आणि नेर येथील तलाठी एस. जे. कोठावदे यांनी पालन केले नाही. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी याद्या पूर्ण करण्याची सूचना या दोन्ही तलाठय़ांना देण्यात आल्या होत्या.

त्यानंतरही दोन्ही तलाठय़ांनी हे काम पूर्ण न केल्याने तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी मंगळवारी तडकाफडकी दोन्ही तलाठय़ांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.निलंबनाचा प्रस्ताव कार्योत्तर मान्यतेसाठी उपविभागीय अधिकारी नंदकुमार बेडसे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. निलंबित करण्यात आलेले दोन्ही तलाठी कामाच्या मुख्यालयी न थांबता पिंपळनेर येथे वास्तव्यास होते. दोन्ही तलाठय़ांच्या कामकाजासंदर्भात यापूर्वीही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.