आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैष्णोदेवी दर्शनाचे स्वप्न अधुरे; भुसावळच्या भाविकाचा वाघा बॉर्डरवर मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील गंगाराम प्लॉट भागातील विजय गजानन नेवे (वय 48) हे कुटुंबियांसह वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते. मात्र, देवीचे दर्शन घेण्यापूर्वीच अमृतसर येथील वाघाबॉर्डरवर त्यांची प्रकृती बिघडली. अमृतसरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भुसावळात बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांचा मृतदेह आणून अंत्यसंस्कार होणार आहेत.

विजय नेवे हे किशोर लॉटरी सेंटरचे संचालक होते. कुटुंबियांसह ते वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते. अमृतसर येथील वाघा बॉर्डर पाहून ते वैष्णोवदेवीचे दर्शनासाठी रवाना होणार होते. अमृतसर येथे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तेथील सुरक्षा रक्षकांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच रक्तदाब कमी होऊन ब्रेन हॅम्ब्रेज झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.