आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवरच ‘व्हॅलेंटाइन डे’ला लाईक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल नेटवर्कच्या संदेशांपुरतीच र्मयादा

फेसबुकवर व्हॅलेंटाइन मॅसेजेसचा पाऊस पडला होता. अनेक प्रकारचे संदेश यानिमित्ताने पोस्ट करण्यात आले होते. त्याचप्रमाणे इमेजवरदेखील भर देण्यात आला. तसेच व्हॉटस्अपच्या माध्यमातून आपले वैयक्तिक संदेश देण्यात आले होते. प्रेमीयुगुलांनी संदेश देण्यावरच यंदा समाधान मानले.

सप्ताहाने घालविली क्रेझ
व्हॅलेंटाइनच्या पार्श्वभूमीवर 7 फेब्रुवारीपासूनच व्हॅलेंटाइन सप्ताह सुरू होतो. सात दिवस चालणार्‍या या सप्ताहाने खर्‍याखुर्‍या व्हॅलेंटाइनची क्रेझच घालविली. यात गुलाब, चॉकलेट, टेडी, प्रॉमिस, भेट, किस असे प्रेमाच्या भावना व्यक्त करणार्‍या सगळ्या फिलिंग सार्ज‍या केल्या जातात. त्यामुळे व्हॅलेंटाइनला काय असा प्रश्न पडलेली तरुणाईचा रंगच यंदा उडाला.
महाविद्यालयांत शुकशुकाट
महाविद्यालयीन परिसरात कोणत्याच प्रकारचा फिव्हर पाहायला मिळाला नाही. परीक्षा, अभ्यासामध्ये गुंतलेले तरुण-तरुणींनी ‘व्हॅलेंटाइन डे’पेक्षा अभ्यासाच्या प्रॅक्टिकलवर भर दिली. सोशल मीडियामुळे अधिक जवळ आलेल्या मित्र मैत्रिणीनींही व्हॅलेंटाइनकडे पाठ फिरविली. ग्रुपने फिरणारे युवक-युवतीही फिरकताना दिसले नाही. त्यामुळे कॉलेज कट्टय़ांवरही शांतता होती.

प्रतिनिधी । जळगाव
निवांत जागा शोधण्याचा प्रयत्न करता मोबाइल टू मोबाइल प्रेमसंदेश आणि हव्या त्या छायाचित्रांची आदान-प्रदान करण्याचा प्रत्यय शुक्रवारी आला. फेसबुक, टिवटर, वी चॅट आणि व्हॉट्स अ‍ॅपवरून अनेकांनी प्रेम जाहीर केले. फेसबुकवरून तर ‘व्हॅलेटाइन्स’खास पेज सेट करून ठेवले आहेत. इंटरनेटमुळे सण, उत्सव आणि असे खास दिवस साजरे करण्याचा ट्रेन्ड आता बदलला आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये ‘व्हलेंटाइन डे’ साजरा करण्याचे फॅड बरेच वाढले. यंदा मात्र सोशल मिडियाची साथ लाभली. इंटरनेटचा फटका वस्तूंच्या खरेदीवर झाला. महाविद्यालयाचा परिसर व तरुणाईच्या कट्टय़ावरही शुकशुकाट दिसून आला.