आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध संजयच्या चेहऱ्यावर याेजनेच्या प्रेमाचे लखलखते तेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - जिल्हापरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भुसावळ येथील उपविभागीय कार्यालयात संजय श्यामराव पाटील हे परिचर म्हणून सेवारत अाहे. दाेन्ही डाेळ्यांनी ते अंध अाहेत. मात्र, पत्नी याेजना यांंच्या डाेळस प्रेमाला ते जगण्याची ऊर्जा मानत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर सदाेदीत तेजासह हास्य जाणवते.
जन्मत: अायुष्याच्या अंधार काेठडीचा सामना हसमुखपणे करणारे संजय पाटील हे परिचर म्हणून शासकीय सेवेत अाहेत. नशिबी अालेल्या अंधारात प्रकाशवाटा शाेधणे ही तर त्यांची खासियत. शिक्षण पदवीपर्यंत झाले अाहे. तसेच हार्माेनियम वाद्यप्रकारात ते संगीत उपांत्य विषारद अाहेत. ते सांगतात की, मुंबईत ‘राष्ट्रीय दृष्टिहीन संघा’चे उपाध्यक्ष म्हणून काम करायचाे. देवबा भिवसन पवार हे संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेचे अध्यक्ष हाेते. एकदा सहज लग्नाचा विषय निघाला तेव्हा त्यांनी सटाणा तालुक्यातील विंचुरे येथे एक अापले अाेळखीचे गृहस्थ अाहेत. त्यांच्या मुलीशी तू लग्न करावं, असा प्रस्ताव मांडला. मी दाेन्ही डाेळ्यांनी अंध असल्याने अापल्याशी काेण लग्न करेल? याबाबत मनात साशंकताच हाेती. मात्र, पवारांनी सूचवलेल्या स्थळी गेल्यावर याेजना हीने क्षणाचाही विलंब करता, हाेकार दर्शवला अन‌् पुढे अाम्ही विवाहबद्ध झालाे. खऱ्या प्रेमाची व्याख्या या प्रसंगातून कळली. एका दिवसाचा ‘व्हॅलेंटाइन-डे’ साजरा करणे म्हणजे त्याला जर काेणी प्रेमाचं काेंदण लावत असेल तर ते उथळ समजावं. अंधांच्या जीवनात डाेळसांनी, दिव्यांगांना अवयव ठिकठाक असलेल्यांनी भावभावना समजून वेदनांवर प्रेमाची फुंकर घातली तरच खरा ‘व्हॅलेंटाइन-डे’ साजरा करण्याला अर्थ अाहे, असे म्हणता येईल.

संजय पाटील योजना पाटील
पाणावलेल्या डाेळ्यातून प्रेमधारा : अंधसंजय पाटील यांना पत्नी याेजना यांची खंबीर साथ अाहे. कागदपत्र लिहिणे, कार्यक्रमांची रूपरेषा अाखण्यासाठीही त्या पार मदत करतात. ‘पुढच्या जन्मात तरी पतीच्या जीवनात प्रकाश येवाे, हेच विधात्याकडे मागणं अाहे. दिव्यांग, गतिमंद, अंधांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवणे हेच खरे प्रेम अाहे’, अशी भावना त्या व्यक्त करतात. मात्र, हे सांगताना त्या प्रेमधारांना वाट करून देतात.

प्रेमाची प्रकाशरूपी किरणे : ‘डाेळ्यांनीतुमच्या जग अाम्ही बघताे, मदतीने तुमच्या जीवन अाम्ही जगताे’ हे बिरूदं नजरेसमाेर ठेवून अंधांच्या जीवनात प्रेमाची किरणे पाेहाेचवण्याचा ध्यास संजय त्यांची पत्नी याेजना या दाेघांनी घेतला अाहे. अॅड. अजिज गुप्ता, अॅड. तुषार पाटील यांचे सहकार्य मिळतेय, असेही ते सांगतात.
व्हॅलेंटाइन-डे विशेष
दशकभरात एक हजार जणांना मदत : भुसावळच्याहिंदू हाउसिंग साेसायटीत संजय पाटील हे भाड्याच्या घरात राहतात. मात्र, असे असले तरी त्यांनी २५ सप्टेंबर २००५मध्ये ‘खान्देश अंध कल्याण संघ’ ही संस्था स्थापन केली अाहे. तिच्या माध्यमातून त्यांनी खान्देशासह महाराष्ट्रातील जवळपास एक हजार अंधांना जीवनावश्यक वस्तू सामाजिक संस्थांतर्फे मिळवून दिल्या अाहेत.