आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन फिव्हर 7पासूनच चढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तरुणाईचा प्रेमाचा दिवस म्हणून ओळख बनलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’चा फिव्हर आतापासून दिसू लागला आहे. महाविद्यालयासह प्रत्येक कट्टय़ांवर सध्या हीच चर्चा ऐकण्यास मिळत आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ पूर्वी विविध डे साजरे करण्यात येतात. त्याचे टाइमटेबलदेखील तयार करण्यात आले आहे. त्यांची अंमलबजावणी 7 फेब्रुवारीला ‘रोझ डे’पासून होते. त्यासाठी तरुणाई सध्या नियोजनात गुंतलेली दिसत आहे.

तरुणाई सध्या ‘डे’मय झाली आहे. फक्त तरुणाईपुरतेच र्मयादित न राहिलेले ‘व्हॅलेंटाइन डे’चे स्वरूप आता बदलत चालले आहे. या ‘डेज’मुळे प्रेमाची व्याख्या बदलल्याने तरुणाईच नाही तर प्रत्येक नात्यातील प्रेम या निमित्ताने व्यक्त केले जाते. मग ते प्रेयसीचे असो वा एका मुलाला आपल्या आईबद्दल वाटणारे. प्रत्येक वयातील आणि नात्यातील प्रेम या ‘डे’ द्वारे व्यक्त केले जात आहे. 14 फेब्रुवारीला असणार्‍या या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आधी सात दिवस विविध प्रकारचे डे साजरे केले जातात. हे सर्व डे प्रेमासंबंधी असल्याने दोन व्यक्तींमधील नाते घट्ट करण्यासाठी त्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.


सात दिवसांचे हे आहेत डेज
7 फेब्रुवारी : रोझ डे
8 फेब्रुवारी : प्रपोज डे
9 फेब्रुवारी : चॉकलेट डे
10 फेब्रुवारी : टेडी डे
11 फेब्रुवारी : प्रॉमिस डे
12 फेब्रुवारी : हग डे
13 फेब्रुवारी : किस डे
14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे

तरुणाईला लागले वेध
सध्या तरुणाईला या डेज चे वेध लागले आहे. मेसेजद्वारे, फेसबुकवर या डेज ची माहिती अनेक जण अपलोड करायला लागले आहे. तसेच व्हॉटस्अपद्वारे ‘मित्रांनो तयारीला लागा’ या प्रकारचे मेसेज एकमेकांना पाठविले जात आहेत.