आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentine's Day 'cause Police Planning In Nashik

व्हॅलेंटाइन-डे’वर पोलिसदादाची नजर, पोलिस अधीक्षकांच्या अधिका-यांना सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हाभरात होत असलेल्या जातीय दंगली महिला, मुलींच्या छेडखानींच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी नियोजन केले. बुधवारी झालेल्या क्राइम बैठकीत पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मार्गदर्शन करत ‘व्हलेंटाइन’च्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
जातीय दंगली रोखण्यासाठी तीन दिवसांच्या आत समाजकंटकांची यादी तयार करून १५ दिवसांच्या आत त्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर सध्या सुरू असलेल्या ‘व्हॅलेंटाइन’ फीव्हरमुळे शहरात मुलींच्या छेडखानीच्या घटनेत वाढ झाली असून पोलिसांनी आपापल्या हद्दीत सतर्क राहून गस्ती वाढवाव्या, असे आदेश केले आहेत. १३ फेब्रुवारी रोजी दहशतवादीविरोधी पथकाची बैठक घेण्यात येणार आहे. देशभरात सुरू असलेल्या दहशतवादी हालचालींसंदर्भात चर्चा करून सतर्कतेबाबतीत आढावा घेण्यासाठी ही बैठक होणार आहे.
अपघात वाढले-
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात ४१ प्राणांतिक अपघात घडले होते. तर यंदा ही संख्या ५० झाली आहे. एकाच महिन्यात अपघात वाढले अाहेत. त्यामुळे हायवे मोहल्ला कमिटीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. सुपेकर यांनी सांगितले.
आय.जी. जिल्ह्यात
नाशिकपरीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे हे २० ते २४ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यात तपासणीसाठी येणार आहेत. त्या अनुशंगाने पोलिस ठाण्यांनी आपले अहवाल अपडेट ठेवावे. पोलिस ठाण्यांच्या आवारात असलेली जप्त केलेली वाहनांची योग्य ती विल्हेवाट लावावी. स्वच्छतेकडे भर द्यावा, अशा सूचनाही डॉ. सुपेकर यांनी दिल्या आहेत. यानंतरही कुणी कर्तव्यात कसूर करेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत वजा इशाराही त्यांनी िदला अाहे.