आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइनच्या उत्साहात पुण्याच्या गुलाबाचा सुगंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ‘व्हॅलेंटाइन डे’च्या सप्ताहाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या सात दिवसांत तरुणाई विविध ‘डे’ साजरा करणार आहे. त्यातील पहिला ‘डे’चा मान ‘रोझ डे’ला असतो. त्या अनुषंगाने तरुणाईची तयारी पूर्ण झाली आहे. ‘रोझ डे’ला आपल्या प्रिय व्यक्तीला वेगवेगळ्या रंगाचे गुलाबाचे फूल देऊन भावना व्यक्त केल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर शहरातील फूलविक्रेत्यांनी पुण्याच्या शीतगृहातील गुलाबाची फुले विक्रीस आणली आहेत.

महाविद्यालयांसह विविध कट्ट्यावर ‘व्हॅलेंटाइन डे’च्या नियोजनाविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विविध ‘डे’च्या माध्यमातून सात दिवस तरुणाई मित्र-मैत्रिणींविषयी असलेली भावना व्यक्त करणार आहे. ‘रोझ डे’ला एकमेकांना फुले देऊन भावना व्यक्त केल्या जातात. त्यामुळे शहरातील फूलविक्रेत्यांनी लाल, पिवळा व पांढरा गुलाब विक्रीस आणला असून, त्यासाठी त्यांची आठवडाभरापासून तयारी सुरू होती. प्रेम, शांती व मैत्रीचा संदेश देणार्‍या गुलाबाच्या फुलांना यंदा बाजारपेठेत मोठा भाव आला आहे. तसेच अन्य फुलांचे भावही दुप्पट झाले आहेत. लग्नाच्या सीझनला ‘व्हॅलेंटाइन डे’ची जोड मिळाल्याने ही भाववाढ झाली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी गुलाबाचे एक फूल 10 ते 15 रुपयांना मिळत होते. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी हा भाव 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचण्याची भीती फूलविक्रेते भानुदास बारी यांनी व्यक्त केली आहे.

‘रोझ डस्ट’ला वाढती मागणी
‘रोझ डे’साठी फूलविक्रेत्यांनी गुलाबाच्या फुलांसह विविध फुले उपलब्ध करून दिली आहेत. जिल्हाभरात गुलाबाच्या फुलांचे उत्पादन अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे पुणे येथील फुलांना अधिक मागणी असते. राज्यभरातील उत्पादकांकडून आलेले गुलाब पुणे येथील शीतगृहात 8 ते 10 दिवस ठेवले जातात व गरजेनुसार उपलब्ध करून दिले जातात. त्यानुसार शहरातील काही विक्रेत्यांनी पुण्याहून गुलाब मागवले आहेत.

लग्नसराई, व्हॅलेंटाइन डे मुळे फुलांना मागणी
‘व्हॅलेंटाइन डे’चा उत्साह सुरू झाल्याने फुलांची मागणीही वाढू लागली आहे. शीतगृहाअभावी फुले अधिक काळ टिकवून ठेवता येत नाहीत. त्यामुळे पुणे येथून गुलाबाची फुले मागवण्यात आली आहेत. तसेच लग्नकार्यांमुळेही मागणी वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना गुलाबाची पुरेशी फुले उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या मागणीतही वाढ केली आहे. - महेश भोळे, गणेश फूल डेकोरेटर्स