आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरणगावच्या ग्रामीण रुग्णालयात तोडफोड; औषधांचीही फेकाफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाव / भुसावळ- दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या दोन गोविंदांवर उपचाराला उशीर होत असल्याच्या सबबीवर जमावाने वैद्यकीय अधिकार्‍यांच्या दालनात तोडफोड केली. औषधी फेकून कर्मचार्‍यांना धक्काबुक्की झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर कर्मचार्‍यांनी पोलिसांना निवेदन दिले.
वरणगाव शहरात पहिल्यांदाच दहीहंडी साजरी झाली. 29 आॅगस्टला झालेल्या या कार्यक्रमासाठी नाथ प्रतिष्ठानने पुढाकार घेतला होता. सात वेगवेगळ्या संघांच्या गोविंदांनी यात सहभाग घेतला. यापैकी एकाच संघातील दोन गोविंदा खाली पडून जखमी झाले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्यांना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी कक्षात नसल्याने उपचारासाठी विलंब झाला. या मुळे संतप्त नागरिकांनी संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली. काहींनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या टेबलावरील काचा फोडल्या. औषध कक्षातील औषधी अस्ताव्यस्त फेकली. कर्मचार्‍यांना धक्काबुक्की झाली. पोलिसांसमोर हा प्रकार झाल्याने कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, शहरात सुसज्ज ग्रामीण रुग्णालय असले तरी अपूर्ण कर्मचार्‍यांमुळे उपचारात बाधा येतात. दुसरीकडे शहर महामार्गावर असल्याने दररोज किरकोळ अपघात होऊन जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले जाते.

कर्मचार्‍यांनी दिले निवेदन
वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी झालेल्या प्रकाराबाबत वरणगाव पोलिस ठाणे आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सविस्तर खुसाला सादर केला आहे. या निवेदनावर डॉ. देवर्षी घोषाल, डॉ.मनोज अडकमोल, एस.एस.मोरे, ए.आर.चौधरी, एस.टी.तडवी, एस.के.बोदडे, आर.पी.पाटील, डी.ओ.फेगडे, मिलिंद मेढे, जे.एच.वाघ, विनोद सुरवाडे, ज्योती गुरव आदींच्या स्वाक्षर्‍या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.