आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला शह देण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीची चाचपणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- वरणगाव पालिकेची अागामी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची माेर्चेबांधणी सुरू झाली अाहे. प्रभाग रचनेवर दाखल हरकतींवरील सुनावणीचा अंतिम अहवाल १३ फेब्रुवारी राेजी प्रसिद्ध हाेणार अाहे.
परंतु, तत्पूर्वी येथे वर्चस्व असलेल्या भाजपला ताकदीने लढत देण्यासाठी सर्वपक्षीय विराेधकांनी अाघाडीसाठी अर्थपूर्ण रसद पुरवणाऱ्या नेतृत्वाचा शाेध सुरू केला अाहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र िवश्वनाथ चाैधरी यांनी समविचारी परंतु मध्यंतरी दुरावलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून सर्वपक्षीय माेट बांधण्याची तयारी सुरू केली अाहे. मात्र, याची जाहीर वाच्यता त्यांनी अद्यापपर्यंत केलेली नाही. प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांनी साेयीनुसार केल्याचा दिंडाेरा पिटून वातावरण िनर्मिती करण्याच्या कामात ते गुंतले अाहेत. बारा बलुतेदार समाजाला एकत्र करून तूल्यबळ पॅनेल देण्याचे अाखाडे त्यांनी बांधले अाहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे यांनीही त्यांच्या साैभाग्यवती राेहिणी जावळे यांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत केलेल्या िवकासकामांची मजबूत ढाल पुढे करून विराेधकांना पािलकेच्या िनवडणुकीत हादरा देण्यासाठी कंबर कसली अाहे. मात्र, मध्यंतरी भाजयुमाेचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील काळे यांच्या माताेश्री रुख्मिणी काळे यांना सरपंचपदाची संधी मिळाल्याने काळे हे नाराज असल्याचा सूर अाहे. िनवडणुका अाल्या म्हणजे वातावरण निर्मितीत अाघाडीवर असणारे काळे यांनी पहिल्यांदाच ‘माैन सर्वार्थ साधनम‌्’ या उक्तीचा अवलंब केल्याने भविष्यात त्यांचा प्रभाव असलेल्या वाॅर्डामध्ये तरी भाजपची िचंता वाढू शकते.
संताेष चाैधरींनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे येथील स्थानिक कार्यकर्त्यांना ऊर्जितावस्था मिळाली अाहे. त्यांनी स्वतंत्र पॅनेल तयार करून त्याचे नेतृत्व करावे, असा एक मतप्रवाह अाहे. त्या अनुशंगाने काही प्रस्थापितांनी गेल्या चार दिवसांपासून हालचाली सुरू केल्या अाहेत.
‘पीअारपी’ची तयारी
अल्पसंख्याकसमाजाला साेबत घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीही येथे लढण्याच्या मानसिकतेत अाहे. िजल्हाध्यक्ष जगन साेनवणे यांनी या अनुशंगाने इच्छुकांची चाचपणी करण्यावर भर दिला अाहे. काँग्रेसनेही प्रभाव असलेल्या वाॅर्डात उमेदवार देण्याच्या अनुशंगाने बैठका घेऊन राजकीय हवेचा अंदाज बांधण्याचे प्रयत्न सुरू केले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी बैठक हाेणार अाहे.

पत्ते उघडण्याची उत्कंठा
ग्रामपंचायतनिवडणुकीत राजेंद्र चाैधरींना माजी अामदार संताेष चाैधरींचे खंबीर पाठबळ मिळत अाले अाहे. मात्र, सध्या त्यांच्या खांद्यावर शिवसेनेचा झेंडा अाहे. पक्षीय पातळीवर निवडणूक झाली तर त्यांच्याकडून राजेंद्र चाैधरींना राजकीय रसद िमळण्याचा मार्ग बंद हाेऊ शकताे. परंतु, सर्वपक्षीय अाघाडीचे समीकरण जुळले तर िनवडणूक रंजक हाेईल. भाजपचे अामदार संजय सावकारे यांच्या मायक्राे प्लॅनिंगकडेही वरणगावातील प्रस्थापितांच्या नजरा एकवटल्या अाहेत. पतसंस्थेमुळे कायद्याच्या कचाट्यात अडकलेले चंद्रकांत हरी बढे हे गेल्या पाच वर्षांपासून राजकीय विजनवासात अाहेत. मात्र, पालिकेच्या िनवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.