आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सेवा गेली कोमात, रुग्ण कल्याण समितीचे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरणगाव - वरणगावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर, जवळपास १२ वर्षांनी रुग्णालय इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. तसेच इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याचे श्रेय लाटण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलेच चमकोनाट्य रंगले होते. रुग्णालयासाठी हक्काची इमारत मिळाल्यानंतर रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा आता फोल ठरली आहे. पालिकेपासून ते थेट केंद्रापर्यंत भाजपचे सरकार आहे. पालकमंत्री, खासदार, आमदारदेखील भाजप पक्षाचेच आहेत. तरीदेखील ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने, नाराजी व्यक्त होत आहे.

वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यासोबतच कर्मचा-यांसाठी नविासस्थाने आणि बाह्यरुग्ण तपासणी केंद्राचेही काम पूर्ण झाले आहे. केवळ दुस-या तिस-या टप्प्यातील कामे अपूर्ण आहेत. रुग्णांना अॅडमिट करण्यासाठी आवश्यक वॉर्ड तसेच शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर नसल्याने, अडचणी येत आहे. निधीअभावी ही कामे रखडल्याचे वास्तव आहे. वरणगाव शहरासह परिसरातील २७ गावांमधील नागरिकांच्या आरोग्य सेवेची मदार रुग्णालयावर अवलंबून आहे. मात्र, सोयी-सुविधांअभावी रुग्णसेवेतील अडचणी अद्यापही कायम आहेत.

कर्मचा-यांची रिक्त पदे भरावीत
गेल्याअनेक दविसांपासून रुग्णालयाच्या विविध विभागांमधील अनेक पदे रिक्त आहेत. या पदांवर जिल्हा रुग्णालयाकडून अद्यापही नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे हजर कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त भार येतो.

पथकाची मदत घ्यावी
ग्रामीण रुग्णालयात शालेय वदि्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी सहा वैद्यकीय अधिका-यांचे पथक आहे. मात्र, हे पथक मुख्यालयी राहत नाही. दररोज सकाळी ११ ते या वेळेत केवळ हजेरी लावण्याचे काम या पथकातील वैद्यकीय अधिकारी करतात. याउलट या पथकाने रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत केल्यास, अनेक अडचणी दूर होतील.

एकाच वैद्यकीय अधिका-यावर मदार
वरणगाव शहर महामार्गालगत आहे. त्यामुळे परिसरात होणा-या अपघातांची संख्या दुर्दैवाने अधिकच आहे. त्यामुळे जखमींना तत्काळ उपचार मिळणे आवश्यक असते. मात्र, रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक तीन वैद्यकीय अधिका-यांची पदे मंजूर असताना, कारभार प्रभारी आहे. डॉ. हर्षल चांदा यांच्या रूपाने एकमेव वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना २४ तास सेवेसाठी तत्पर राहावे लागते.

ग्रामीण रुग्णालयात वारंवार होणारी रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली आहे. तसेच येथील रुग्ण कल्याण समितीची बैठक लवकरात लवकर बोलवावी, यासाठी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्रही दिले आहे. सुनीलकाळे, सदस्य, रुग्ण कल्याण समिती

जिल्हाभरात वैद्यकीय अधिका-यांची संख्या कमी आहे.मंत्रालयात याबाबत नुकतीच बैठक झाली आहे. या बैठकीत रिक्त जागा भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या घटनेची चौकशी करून, येथील समस्या दूर करण्यासाठी स्वत: लक्ष घालू. राजकुमारसूर्यवंशी, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव

एक्स-रे मशीन पडले धूळ खात
लाखोरुपयांचा निधी खर्च करून एक्स-रे मशीन लावण्यात आले आहे. मात्र, टेक्निशियन अभावी मशीन धूळ खात पडले आहे. रुग्णांना एक्स-रेची गरज पडल्यास भुसावळ येथे धाव घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांना वेळ, पैसा खर्च करावा लागतो.

पदाधिकारी लांबच
गेल्याअनेक दविसांपासून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेय घेण्यासाठी स्थानिक राजकीय पदाधिका-यांनी नाट्य रंगवले होते. मात्र, रुग्णांची सध्या होणारी गैरसोय थांबवण्यासाठी या पदाधिका-यांपैकी कुणीही पुढाकार घेतलेला नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यामुळे राजकीय पदाधिका-यांनी किमान ग्रामीण भागातील रुग्णांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, अशी अपेक्षा आहे.