आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Various Cultural Programme Arranged For Subhash Chandra Bose Birth Anniversary

‘देस रंगीला’वर धमाल, सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘बोलेंगे हमको प्यार से इंडियावाले’, ‘भारत हमको जान से प्यारा है’ म्हणत ‘देस रंगीला’ सारख्या देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. या नृत्यांनी प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची ज्योत जागवली.

सुभाष चौक पतसंस्थेतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ११८व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी समूहनृत्य स्पर्धा झाली. या स्पर्धेत २२ शाळांच्या ५६४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. नेताजींच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, नवनिर्वाचित आमदार स्मिता वाघ, महापौर राखी सोनवणे, आयुक्त संजय कापडणीस, स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत खटोड, संजय गांधी, नितीन चांडक, सपन झुनझुनवाला, नंदकुमार पवार, चंदनमल अग्रवाल उपस्थित होते. ग्लॅडिएटर डान्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी "देवा श्री गणेशा' या नृत्याने कार्यक्रम सुरु झाला. यामध्ये सचिन पाटील, सुजाता बेद, श्रेया झोपे, कुणाल तिलकपुरे, मोहित खेडकर, निखिल जगताप, आकाश जगताप यांनी सहभाग नोंदवला. तसेच पोलिस बॅण्ड पथकाचे सादरीकरण झाले. यात पलोड शाळेचा विद्यार्थी नमन गांधी याने की-बोर्डवर साथसंगत दिली. मोहन तायडे यांचा ऑक्रेस्ट्रादेखील होता. श्याम जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

समूहनृत्य स्पर्धेचा निकाल असा
प्रथमसु.ग.देवकर विद्यालय, द्वितीय अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय प्रगती विद्यामंदिर. उत्तेजनार्थ ला.ना.सार्वजनिक विद्यालय, पी.एम.मुंदडे विद्यालय, विवेकानंद प्रतिष्ठान.

मनोरे अन् नाटिकेचे सादरीकरण
विद्यार्थ्यांनीजगाले जझबा, वंदे मातरम‌्, मानसा-मानसा कधी व्हशील रे मानूस, भगवान है कहाॅ तू, सुनो गौर से दुनियावालो या सारख्या गाण्यांवर नृत्य सादर केले. या वेळी त्यांनी अनेक मनोरे सादर केले होते. भारताचा झेंडा तसेच रंगीबेरंगी प्रकारे आकर्षक थीम देखील यात घेण्यात आली होती. तसेच "ये हिंदोस्ताँ हमारा' ही नाटिका सादर करण्यात आली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंत्तीनिमित्त आयोजित समूहनृत्य स्पर्धेत देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करताना प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडीयम स्कूलचे विद्यार्थी. तर दुसऱ्या छायाचित्रात प्रगती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी.

यांनी नोंदवला कार्यक्रमात सहभाग
स्पर्धेतमहाराणा प्रताप, चांदसरकर, विद्या विकास, अभिनव प्राथमिक, प्रगती माध्यमिक, नंदिनीबाई, ला. ना., विवेकानंद प्रतिष्ठान, प्रेमाबाई जैन, भाऊसाहेब राऊत, जयदुर्गा माध्यमिक, अत्रे, मुंदडे, श्रीराम माध्यमिक, यादव देवचंद, मानवसेवा मंडळ, देवकर, अभिनव माध्यमिक, का.उ. कोल्हे, खडके विद्यालय, प्रोग्रेसिव्ह,अनुभूती स्कूल या विद्यालयांनी सहभाग नोंदवला.