आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगवेगळे फीचर्स असलेले मोबाइल येणार बाजारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मागील 20 दिवसांत बर्‍याच कंपन्यांनी नवीन मोबाइल हॅण्डसेट बाजारात आणले आहेत. अजून वेगळ्या फीचर्स असलेल्या काही मोबाइलची प्रतीक्षा आहे. यात काही कमी किमतीचे मोबाइल आहेत. काही एंड्रायडचे महाग हॅण्डसेट तर काही कंपन्यांनी अपकमिंग हॅण्डसेट मोबाइल बाजारात येणार आहेत.

मोबाइल व्यावसायिकांच्या मतानुसार महाग फोनमध्ये जास्ती तर क्लासिक ब्लॅक आणि व्हाइट कलर हॅण्डसेटच पसंद केले जात आहेत. ब्लॅकबेरी जेड-10 ला सध्या फारच मागणी आहे. सोनी एक्सपिरिया जेडची तरुणांमधून अधिक मागणी व चौकशी सुरू आहे. हा वॉटर रेजिस्टेंट स्क्रीनमध्ये येतो. सॅमसंग एस 4 मध्ये फेक्जिबल स्क्रीन आहे.

आऊट ऑफ स्टॉक
ब्लॅकबेरी स्टोअरमध्ये जेड 10 चे 8 ते 10 हॅण्डसेट विक्री झाले. देव मोबाइलचे संचालक महेश मुणोत सांगतात की, ब्लॅकबेरीला अन्य मॉडेलप्रमाणे चौकशी नव्हती. युवकांची अत्याधुनिक सुविधा असलेल्या मोबाइलला मागणी आहे.

फ्लेक्जिबल स्क्रीन
सॅमसंगचे डिलर महेश मुणोत सांगतात की, सध्या सॅमसंग एस-4 ची युवकांकडून विचारणा होत आहे. फ्लेक्जिबल डिस्प्ले असलेल्या या फोनची स्क्रीन कशीही फोल्ड होते, मात्र तुटत नाही. हा हाताळण्यासाठी योग्य असल्याचे वितरकांचा दावा आहे.