आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल कंपन्यांचा दिवाळी धमाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दिवाळीनिमित्त मोठय़ा संख्येने नवा ग्राहक खेचण्यासाठी टेलिकम्युनिकेशन बाजारातही चांगलीच तेजी आली आहे. नामांकित मोबाइल कंपन्यांनी दिवाळीसाठी खास टॉकटाईम, एसएमएस, जीपीआरएस आणि थ्री जी ऑफर जाहीर केल्या आहेत. सर्वच कंपन्यांचे लक्ष तरुणांकडे असून सुविधाजनक असे प्लॅन आले आहेत.

तीन नामांकित कंपन्यांनी शहरातील शाळा-महाविद्यालयांचे परिसर, मुख्य बाजारपेठेत स्टॉल्स उभारले आहेत. नवीन जोडण्या मिळविण्यासाठी एका कंपनीने दोन रुपयात सिमकार्डाची विक्री सुरू केली आहेत. आणखी एका खासगी कंपनीने 100 रुपयात दोन सिमकार्ड देण्याची योजना जाहीर केली आहे. या दोन्ही सिमकार्डावर कॉलिंग दोन महिन्यांपर्यंत एक पैसा प्रति मिनिट असेल.

कुठल्या सुविधेला मागणी

भुरळ घालणार्‍या ऑफर
500 रुपयांच्या टॉकटाइममध्ये 35 टक्के टॉकटाइम मोफत
201 रुपयांच्या टॉक टाइममध्ये 90 पैसे प्रति मिनिट दर
आठ रुपयांत एका दिवसासाठी 20 मेगाबाइट इंटरनेट जोडणी
950 रुपयांत तीन महिन्यांसाठी पाच मेगाबाइट इंटरनेट जोडणी
सहा रुपयांत दोन दिवसांसाठी अंतर्गत कॉल मोफत
99 रुपयात सहा हजार सेकंद अंतर्गत आणि 12 हजार सेकंद इतर

टॉकटाइमची वाढती मागणी
उत्सवाच्या काळात सर्वाधिक मागणी असते ती एसएमएस पॅकला, कंपन्यांचे सिमकार्डही त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर खपतात. ही मागणी लक्षात घेऊन सर्वच नामांकित कंपन्यांनी नवीन योजना, टॉकाटाइम, एसएमएसचे नवे पॅकेजेस जाहीर केले आहेत. टॉकटाइम एसएसएम, इंटरनेट पॅकच्या मागणीचा आलेख सतत चढताच आहे. प्रीपेड सिमकार्डधारकांची संख्या यात अधिक आहे. सतीश जाधव, सिमकार्ड विक्रेता

15 टक्के जी.पी.आर.एस.
13 टक्के थ्रीजी
48 टक्के टॉकटाइम
29 टक्के एसएमएस