आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरू निधीतून दोन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांना कुलगुरू वैद्यकीय निधीतून आर्थिक मदतीचा धनादेश कुलगुरू डॉ. सुधीर मेर्शाम यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतील बी.टेकच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी विशाल बारी याला 10 हजार रुपयांचा तर संगणकशास्त्र प्रशाळेतील प्रथम वर्षाचा विद्यार्थी राकेश गिरासे याला दोन हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. बारीला अपघातात पायाला तर गिरासेच्या हाताला दुखापत झाली आहे. विद्यार्थी कल्याण मंडळांतर्गत कुलगुरू वैद्यकीय निधीतून आर्थिक मदत करण्यात आली. या वेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा. सत्यजित साळवे उपस्थित होते.