आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवारीचा धाक दाखवत लुटले सहा लाख रुपये, भरदिवसा पावणेदोन लाखांची घरफोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भाजी मार्केटमध्ये आडत व्यवसाय करणार्‍या निर्मला राजेंद्र चौधरी (वय 39, रा.सरस्वतीनगर, जुना खेडीरोड) यांच्यासह त्यांच्या पतीला चाकू आणि तलवारीचा धाक दाखवत सहा लाख रुपयांची रोकड लंपास केली. शनिवारी पहाटे 5 वाजता ऑटोनगर भागातील हॉटेल प्रिन्स पॅलेस येथे हा थरार घडला.

निर्मला चौधरी या बाजार समितीमधील आडत व्यापार्‍यांमधील मोठय़ा व्यापारी म्हणून ओळखल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून दररोज पहाटे 5 वाजता पतीसह बाजार समितीमध्ये जाण्याचा त्यांचा दिनक्रमच आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे त्या दुचाकीने (एमएच 19 एएल 2275) निघाल्या होत्या. प्रिन्स पॅलेस हॉटेलजवळ पोहोचताच मागून आलेल्या एका दुचाकीवरील तीन युवकांनी दुचाकीसमोर उभी करून त्यांना रोखले. काही कळण्याच्या आतच त्यावरील दोन युवक खाली उतरले. एकाने निर्मला चौधरी यांच्यावर तलवार रोखली. तर दुसर्‍याने त्यांच्या पतीच्या पोटावर चाकू ठेवला. काही सेकंदातच झटापट सुरू झाली. यात एकाने निर्मला चौधरी यांना लाथ मारून जमिनीवर पाडले आणि त्यांच्या हातातीत पिशवी हिसकावली. या पिशवीत सहा लाख रुपये होते. पुढच्या सेकंदाला चालकाने दुचाकी वळवत पुन्हा भुसावळच्या दिशेने फिरवली आणि भरधाव निघून गेले.
सीसीटीव्ही फुटेजची शोधाशोध
घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते आणि एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बी.के.कंजे यांनी घटनास्थळी भेट दिली. बच्छाव आणि रायते यांनी पहाटेच्या वेळी परिसरातील काही दुकाने, हॉटेलवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी केली होती. त्यानुसार दुपारी कंजे यांनी परिसरातील शिवशक्ती कार बाजार आणि खेडी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती चोरट्यांचे फुटेज उपलब्ध झाले नव्हते.