आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीपाल्याच्या भावात माेठी घसरण; कोथिंबीर 15 रु. किलो, कांदा अजूनही 50 रुपये किलो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बाजार समितीमध्ये पालेभाज्यांच्या आवकमध्ये दुपटीने वाढ झाल्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्पादनात वाढ झाल्याने दरात मात्र कमालीची घसरण झाली असून यामुळे ग्राहकांमध्ये आनंद, तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जळगावसह धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पालेभाज्यांची आवक होते. कोथिंबीर, मेथी, कांदापात, पालक या पालेभाज्या, तर कोबी, वांगे, गिलके, दोडका आदी भाज्यांची आजूबाजूच्या खेड्यातून धुळे जिल्ह्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर आवक होत अाहे. पालेभाज्यांची अावक माेठ्या प्रमाणात वाढल्याने मात्र भाजीपाल्यांचे दर घसरले आहेत. तर दरात माेठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकरीवर्ग मात्र चिंतेत पडला आहे.

 

कोथिंबीर, मेथी, पालकची जुडी अधिकच स्वस्त
पालेभाज्यासडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यांना अधिक काळासाठी साठवूनही ठेवता येत नाही. शेतातून भाजीपाला आणल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच ताे बाजार समिती अथवा किरकोळ व्यापाऱ्याला विकल्याशिवाय पर्याय नसतो. यात जी कोथिंबीर ३० रुपयांत ५० ग्रॅम मिळत होती, तीच आज १५ रुपये किलोने मिळत आहे. तर कोथिंबीरची जुळी रुपयांना मिळत आहे. तसेच मेथी पालक २० ते २५ रुपये किलोने तर जुळी रुपयांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे लोकांच्या आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच भाजीपाला तसेच कोथिंबीर स्वस्त झाल्याने चायनीज सेंटर, पावभाजी सेंटरवर देखील आता ताजा भाजीपाला पाहायला मिळत आहे. तेथे देखील कोथिंबीरचा घमघमाट सुटायला लागला आहे.


गाडी भाडे निघणे ही मुश्किल
पालेभाज्यांचे दर घसरल्याने उत्पादन खर्च निघणे ही कठीण झाले आहे. अगोदरच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भाजीपाला काढण्याची मजुरी, तसेच गाडी भाडेही सुटत नाही. त्यामुळे आमच्या सारख्यांचे मोठे नुकसान होत आहे.
- प्रभाकर चिरमाडे, शेतकरी

 

अावक वाढल्याने दर घसरले
आजूबाजूच्या खेड्यातून तसेच धुळे जिल्ह्यातून पालेभाज्या विक्रीसाठी येत असल्याने गेल्या काही दिवसांत आवक वाढली आहे. शेतकऱ्यांकडून ही मोठ्या प्रमाणात पालेभाज्या विक्रीसाठी येत आहेत. आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.
- सुनील भोई, भाजीपाला व्यावसायिक

 

कांद्याच्या भावात अजूनही तेजी
स्थानिकआवक कमी बेमोसमी पाऊस यामुळे कांद्यांचे दर वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे कांदा चाळीत शेतात अशा दोन्ही स्वरुपात होता. मात्र, ढगाळ वातावरण बेमोसमी स्वरुपातील पावसामुळे कांदा पिकावर तसेच साठवलेल्या कांद्यावर परिणाम होऊन तो सडत आहे. तसेच त्याला कोंब फुटणे, टोंगळा निर्माण होऊन त्याचे उत्पादन कमी निघत आहे. पर्यायाने कांद्याच्या भावात तेजी येत आहे. हेच भाव अजून काही दिवस राहतील, असे जाणकरांचे मत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...