आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात भाजीपाला आवाक्यात; थाळी होणार रुचकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- गेल्या आठवड्यापर्यंत गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे दर चार दिवसातच गडगडले. यामुळे सहा महिन्यांपासून चिंतित गृहिणींना दिलासा मिळाला. दररोजच्या जेवणातील थाळी आता अधिक रुचकर होण्यास मदत होणार आहे.

उन्हाळ्यातील दुष्काळी स्थितीमुळे भुसावळच्या बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली होती. उन्हाळ्यापेक्षाही जून महिन्यात भाजीपाला बाजाराने प्रचंड तेजीचा अनुभव घेतला. सरासरी 60 रुपये किलोपेक्षा जास्त भाव झाल्याने गृहिणींचे ‘किचन कॅबिनेट’ कोलमडले. जेवणाला चव देणार्‍या कोथिंबीरचे भाव 100 रुपये किलोपुढे गेले होते. गेल्या आठवड्यात किचिंत घट होऊन ते 80 रुपये किलो झाले होते. आता मात्र 50 रुपयांची घसरण झाल्याने रविवारच्या भुसावळातील बाजारात कोंथिबीर 30 रुपये किलोने विक्री झाली. एका किलोसाठी 80 रुपये मोजूनही न मिळणारी मेथीची भाजी आता 10 रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आली आहे. बटाटे (20 रुपये), चवळी-टमाटे (60 रुपये), पत्ताकोबी (20 रुपये), फुलकोबी, दोडके (40 रुपये), कारले (60 रुपये), असे बाजारभाव कायम आहेत. 15 रुपये घसरणीनंतर वांगे 25, तर 40 रुपये किलोवरून पोकळा आता 20 रुपये किलोने विक्री होताना दिसतो. भेंडी आणि मिरचीचे भाव 40 रुपयांवर स्थिरावले आहेत.