आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vegetable Rate News In Marathi, Vegetable Rate Increase Issue At Jalgaon, Divya Marathi

तापमानासोबत भाजीपाल्याचे भावही वधारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या दोन महिन्यात भाजीपाल्याची आवक वाढल्याने महागाईच्या काळात किचनमधील भाज्यांच्या आर्थिक बजेटवरील ताण कमी झाला होता. मात्र, उन्हाळ्याची चाहूल लागल्याने तापमानाचा पारा हळूहळू वर चढत आहे; त्याप्रमाणे भाज्यांच्या भावात किलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. मार्च महिन्यापर्यंत भाज्यांचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.

पावसाचा परिणाम
यंदा पाऊस जास्त झाल्याने शेतशिवारात भाज्यांचे उत्पन्नही भरपूर झाले; त्यामुळे मोठय़ाप्रमाणात बाजारात भाज्यांची आवक वाढून दर सर्वसामान्यांच्या अवाक्यात आले होते. यात पालेभाज्यांचे दर कमालीचे खाली आले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने भाज्यांची आवकही घटू लागली आहे. त्यामुळे पाले भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत.

कांद्याचा दिलासा
दोन महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव किलोला शंभरापर्यंत भिडले होते. मात्र, आवक वाढल्याने त्याचे भाव 10 ते 15 रुपये किलोवर आले आहेत. तसेच बटाटा 15 ते 20 आणि लसून 30 ते 35 रुपये किलो आहे. त्यामुळे गृहिणींना त्याचा काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यापर्यंत भाजीपाल्याचे भाव कमी होते. आता आवक काही प्रमाणात घटली असल्याने भाव वाढायला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यापर्यंत भाज्यांचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे. मनोज चौधरी, भाजी विक्रेता

भाजीपाल्याचे दर (प्रति किलोप्रमाणे)
भेंडी 35 ते 40
मेथी 35 ते 40
पालक. 30 ते 35
पोकळा 15 ते 20
मिरची 20 ते 25
वालशेंगा 30 ते 35
वांगे 30 ते 40
टमाटे 10 ते 12
फ्लॉवर 20 ते 25
दुधी भोपळा 30 ते 35
कांद्याची पात 20 ते 25
भरताची वांगी 20 ते 25
शेवगा 35 ते 40
वाटाणे 20 ते 25